मंद्रुप येथे अपघातात महिला ठार;एक जखमी
By Admin | Updated: May 27, 2014 00:45 IST2014-05-27T00:45:28+5:302014-05-27T00:45:28+5:30
मंद्रुप: तुळजापूरला जाताना रस्त्यात ट्रकने जोरदार धडक दिल्याने महिला ठार झाली तर दुसरी महिला जखमी झाली.

मंद्रुप येथे अपघातात महिला ठार;एक जखमी
मंद्रुप: तुळजापूरला जाताना रस्त्यात ट्रकने जोरदार धडक दिल्याने महिला ठार झाली तर दुसरी महिला जखमी झाली.सोलापूर-विजापूर महामागार् वरील तेरा मैल येथील वैष्णवी पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. रमेश तलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सावित्री गुरुसिद्ध अंबिगेरे (वय ३२, रा. विद्यानगर, हुबळी) व देवकी गुरप्पा कोलकर या बहिणी तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. वैष्णवी पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडताना समोरुन येणार्या के. एल-३५ बी. ९४३९ या ट्रकच्या चालकाने भरधाव वेगाने व चुकीच्या दिशेने धडक दिली. यात सावित्री अंबिगेरे या महिलेच्या पोटावरुन ट्रकचे पुढील चाक गेल्याने ती जागीच ठार झाली तर देवकी गुरप्पा कोलकर ही जखमी झाली. चालक फरार झाला. हवालदार सय्यद मुलाणी हे तपास करीत आहेत. या घटनेची मंद्रुप पोलिसात नोंद झाली.