शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सोलापूर मंडलातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता महिला कमांडो

By appasaheb.patil | Updated: December 6, 2018 14:33 IST

आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांची माहिती

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवर, बॉडीवन कॅमेरा, कमांडोज, डॉग स्कॉडही तैनात करणारसर्वच प्रवाशांना सुरक्षा पुरविणे मोठे चॅलेंज असल्याचे आरपीएफ पोलिसांनी सांगितलेआता आरपीएफ पोलिसांच्या खिशाला बॉडीवन कॅमेरे बसविण्यात येणार

सोलापूर : सोलापूर मंडलात धावणाºया प्रत्येक रेल्वे गाडीतील प्रवाशांना सुरक्षा पुरविण्याबरोबरच सातत्याने पडणारे दरोडे, वाढत्या चोºया, जागा पकडण्यासाठी प्रवाशांची जीवघेणी घुसखोरी, प्रवासादरम्यान महिलांची होणारी छेडछाड, चेन स्नॅचिंग आदी गुन्हेगारी कृत्य रोखण्यासाठी आरपीएफ पोलिसांनी खंबीर पाऊल उचललेले आह़े. सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवर, बॉडीवन कॅमेरा, महिला सुरक्षा गार्ड, कमांडोज, डॉग स्कॉड याबरोबरच आता सुरक्षेसाठी महिला कमांडोही तैनात करण्यात येणार आहेत. या उपाययोजनांबाबत सोलापूर मंडलातील आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांच्याशी साधलेला संवाद.

मालधक्का परिसरात वारंवार होणाºया चोºयावर नियंत्रण मिळविण्यासाठी मालधक्का परिसरात सुरक्षा भिंत उभा करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही सुरक्षा भिंत ७ फूट उंचीची असणार आहे़ यासाठी साधारण  ५० ते ७० लाख खर्च अपेक्षित आहे़ या सुरक्षा भिंतीवर तारेचे कुंपन लावण्यात येणार आहे़ याशिवाय या परिसरात दोन वॉच टॉवर, तीन गेट उभे करण्यात येणार आहे़ सध्यस्थितीला सुरक्षेच्या कारणास्तव आरपीएफचे २ जवान रात्रीच्या वेळी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वे प्रवासादरम्यान पालकांपासून दुरावलेली लहान मुले व मानसिक त्रासाने ग्रस्त असलेल्या महिलांना आरपीएफ पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. यातील ५३ लहान मुले व ८ महिलांना आरपीएफ पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन केल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी दिली.

महिला सुरक्षा गार्ड तैनात करणार- रेल्वे प्लॅटफॉर्म व रेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड आदी महिला प्रवाशांच्या हितासाठी आता रेल्वेत आरपीएफ पोलीस विभागातर्फे महिला सुरक्षा गार्ड तैनात करण्यात येणार आहेत़ यासाठी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स व आरपीएफ पोलीस यांच्यात करार करण्यात आला आहे़ प्रायोगिक तत्त्वावर जानेवारी महिन्यात सोलापूर विभागात महिला सुरक्षेसाठी २४ महिला गार्ड तैनात करण्यात येणार आहेत़ या महिला गार्ड रेल्वे गाडी, प्लॅटफॉर्मवरील महिला प्रवाशांना सुरक्षा पुरविणार आहेत़

कुर्डूवाडी-दौंड दरम्यान ४५ कमांडोज तैनात- सिग्नल परिसरात अंधाराचा फायदा घेऊन रेल्वे गाडीत दरोडा टाकणाºया चोरट्यांवर पायबंद घालण्यासाठी कुर्डूवाडी ते दौंड दरम्यानच्या सिग्नल परिसरात ४५ कमांडोज तैनात करण्यात आले आहेत़ हे कमांडोज कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी बंदोबस्त करीत आहेत़ सोलापूर मंडलात एका दिवसात किमान ९५ रेल्वे गाड्या धावतात त्यापैकी ७९ गाड्या या रात्रीच्या वेळी धावतात़ त्यामुळे आरपीएफ पोलिसांना सर्वच प्रवाशांना सुरक्षा पुरविणे मोठे चॅलेंज असल्याचे आरपीएफ पोलिसांनी सांगितले़ 

बॉडीवन कॅमेºयांद्वारे रेल्वेत ठेवणार जवान नजर- प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वेत होणारे टाळण्यासाठी आता आरपीएफ पोलिसांच्या खिशाला बॉडीवन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ सोलापूर मंडलात रात्रीच्या वेळी ७९ रेल्वे गाड्या धावतात़ प्रत्येक रेल्वे गाडीतील ३ जवानांना कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ यामुळे महिला छेडछाड व रेल्वेत होणाºया अनुचित प्रकाराला आळा बसेल़ शिवाय लाईव्ह रेकॉडिंग असल्यामुळे तक्रार नोंदविण्यास पोलिसांना या कॅमेºयातील चित्रफित एक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास मदत होणार आहे़ 

५६६ केसेसमधील ४८ आरोपींना केली अटकरेल्वेत चोरी, महिलांची छेडछाड व अन्य गुन्हे करणाºया ५६६ जणांविरुद्ध आरपीएफ पोलिसांनी केसेस केल्या होत्या़ यातील सर्वच केसेसचा निपटारा करण्यासाठी आरपीएफ जवान सतर्क आहेत़ दरम्यान, आतापर्यंत ४८ आरोपींना अटक करण्यात आरपीएफ पोलिसांना यश आले आहे़ याशिवाय मागील ३ महिन्यात १६ केसेस करून १७ आरोपींना अटक केली आहे़ उर्वरित आरोपी व गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.

२० रेल्वे स्टेशनवर उभारणार वॉच टॉवर- रेल्वे स्टेशन परिसरात होणाºया छेडछाड, अनुचित प्रकारावर आळा घालण्यासाठी सोलापूर मंडलातील २० रेल्वे स्थानकावर वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. याशिवाय सिग्नल परिसरात दरोडे जास्त प्रमाणात पडतात़ अंधाराचा फायदा घेऊन चोरी करणारे चोरटे कैद व्हावेत यासाठी सिग्नल परिसरात सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ 

महापरिनिर्वाण दिनाच्या विशेष गाडीसाठी ५० जवान- महापरिनिर्वाणदिनानिमित्त सोलापूरहून मुंबई व मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी मध्य रेल्वे विभागाने विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था केली आहे़ ही गाडी ५ डिसेंबर रात्री १० वाजता सुटली असून ७ डिसेंबर रोजी परतणार आहे़ या गाडीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता आरपीएफ पोलिसांनी जादा ५० जवानांचा बंदोबस्त ठेवला आहे़ या बंदोबस्तात विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांचाही समावेश आहे़ 

दोन डॉग स्कॉड दाखल- रेल्वेत होणाºया चोºया रोखण्यासाठी सोलापूर मंडलातील आरपीएफ पोलीस विभागात दोन डॉग स्कॉड दाखल झाले आहेत़ रॅबो व सॅडी असे डॉगचे नाव आहे़ मागील ७ महिन्यांपासून पुणे येथे या डॉग स्कॉडला ट्रेनिंग देण्यात आले आहे़ मंडलात आणखीन ६ डॉग स्कॉड लवकरच येणार असल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली़ पुणे येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये सध्या १५ डॉग स्कॉड ट्रेनिंग घेत असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेPoliceपोलिस