अनैतिक संबंध दडविण्यासाठी महिलेचा खून
By Admin | Updated: June 13, 2014 00:44 IST2014-06-13T00:44:02+5:302014-06-13T00:44:25+5:30
महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

अनैतिक संबंध दडविण्यासाठी महिलेचा खून
नातेपुते : अनैतिक संबंध उघडकीस येऊन बेईज्जत होईल म्हणून संतोष सुखदेव बोरकर (रा. लासुर्णे, ता. इंदापूर) याने अनोळखी साथीदाराच्या मदतीने पळसमंडळ (ता. माळशिरस) येथून पळवून नेऊन महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत नातेपुते पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मयत महिला ही लासुर्णे (ता. इंदापूर) येथील रहिवासी असून पळसमंडळ (ता. माळशिरस) हे तिचे माहेर आहे. तिचा पती हा सेलम (तामिळनाडू) येथे सोन्या-चांदीच्या दुकानात कामानिमित्त जात असल्याने त्याचा फायदा उठवून संतोष याने मयत महिलेशी अनैतिक संबंध जुळविले होते.