पहाटे समर्थांच्या दर्शनाला निघालेली महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:25 IST2021-08-23T04:25:00+5:302021-08-23T04:25:00+5:30

कारच्या धडकेने जागीच ठार : दोघी जखमी लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायी चालत निघालेली महिला ...

The woman who went to see Samarth in the morning | पहाटे समर्थांच्या दर्शनाला निघालेली महिला

पहाटे समर्थांच्या दर्शनाला निघालेली महिला

कारच्या धडकेने जागीच ठार : दोघी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायी चालत निघालेली महिला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्यामुळे जागीच ठार झाली तर तिच्यासोबत निघालेल्या दोन महिला जखमी झाल्या.

रत्नाबाई तुकाराम कोळी असे जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव असून पहाटे ५.३० वाजता वळसंग बसस्थानकासमोर ही घटना घडली.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार, तोगराळी येथील महादेव भीमाशंकर भुयारे, त्यांची पत्नी महादेवी भुयारे, कल्पना श्रीमंत पाटील, मीनाबाई शेटप्पा कोळी, रत्नाबाई तुकाराम कोळी असे पाच जण रविवारी पहाटे अक्कलकोटला समर्थांच्या दर्शनासाठी पायी चालत निघाले होते. वळसंग बसस्थानकाजवळ पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात कल्पना पाटील आणि मीनाबाई कोळी या दोघी जखमी झाल्या तर रत्नाबाई तुकाराम कोळी गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्या.

याबाबत महादेव भीमाशंकर भुयारे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वळसंग पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार बाबूजी राठोड या अपघाताचा तपास करत आहेत.

------

फोटो :

Web Title: The woman who went to see Samarth in the morning