Woman tortured for two-wheeler, four charged | दुचाकीसाठी महिलेचा छळ, चौघांवर गुन्हा दाखल

दुचाकीसाठी महिलेचा छळ, चौघांवर गुन्हा दाखल

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता प्रियंका आणि भानुदास गायकवाड यांचे लग्न डिसेंबर २०१८ रोजी मोहोळ येथे झाले होते. लग्नानंतर एक महिना सासरच्या लोकांनी तिला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर पती भानुदास याने दुचाकी खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून प्रियंकाला शारीरिक, मानसिक त्रास देऊ लागले. त्यानंतर सासरा मारुती गायकवाड, सासू लक्ष्मी गायकवाड आणि दीर अनिल गायकवाड हे देखील तिला पैशाची मागणी करून शिवीगाळ, मारहाण करणे, उपाशी ठेवणे, रात्री-अपरात्री घरातून बाहेर हाकलून देणे अशा पद्धतीने त्रास सुरू केला. या प्रकाराबाबत प्रियंकाच्या माहेरच्या लोकांनी समजावून सांगूनही त्यांच्या वर्तनात फरक पडला नाही. अखेर त्यांनी २८ मार्च २०१९ रोजी प्रियंकाला मारहाण करून घरातून हाकलून दिले. त्यामुळे ती माहेरी आई-वडिलांकडे राहत आहे.

दरम्यान, भानुदास गायकवाड याने आई, वडील व भाऊ यांच्याशी संगनमत करून दुसरे लग्न केले. याबाबत त्याने १ मार्च २०२१ रोजी सारोळे येथे येऊन मी दुसरे लग्न केले आहे, मला त्रास होईल असे वागू नका, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून निघून गेला.

दरम्यान, घडल्या प्रकाराबाबत प्रियंका गायकवाड हिने ८ मार्च रोजी मोहोळ पोलिसात तक्रार दिली. यावरून पती, सासू-सासरे व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लोभू चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: Woman tortured for two-wheeler, four charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.