गुन्ह्यात नाव गाेवल्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:26 IST2021-08-24T04:26:54+5:302021-08-24T04:26:54+5:30
अक्कलकोट : पूर्वीच्या गुन्ह्यात नाव का गोवले, म्हणत तालुक्यात एका गावात पंचायत सुरू असताना, एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून पीडित ...

गुन्ह्यात नाव गाेवल्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग
अक्कलकोट : पूर्वीच्या गुन्ह्यात नाव का गोवले, म्हणत तालुक्यात एका गावात पंचायत सुरू असताना, एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून पीडित महिलेशी असभ्य वर्तन करीत मारहाण केली. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पीडितेच्या फिर्यादीवरून १० ऑगस्ट रोजी नागनाथ राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंदला होता. या प्रकरणात संजय राठोड याचेही नाव होते. तेव्हापासून तो पीडितेला धमकावत होता. त्या दिवशी पूर्वीचे प्रकरण मिटविण्यासाठी बैठक बसली होती. तेव्हा तिथे येऊन आरोपी संजय राठोड, त्याची पत्नी, बहीण या तिघांनी शिवीगाळ करून असभ्य वर्तन केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस नायक शेख करीत आहेत.