पतीशी झालेल्या भांडणातून माहेरी आलेली महिला पाचही मुलांना सोडून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST2021-09-17T04:28:02+5:302021-09-17T04:28:02+5:30

राजुरी माहेर असलेल्या या महिलेचे पांडे हे सासर आहे. तिला चार मुली व एक मुलगा असा परिवार असून, पती ...

The woman left her five children after a quarrel with her husband | पतीशी झालेल्या भांडणातून माहेरी आलेली महिला पाचही मुलांना सोडून गेली

पतीशी झालेल्या भांडणातून माहेरी आलेली महिला पाचही मुलांना सोडून गेली

राजुरी माहेर असलेल्या या महिलेचे पांडे हे सासर आहे. तिला चार मुली व एक मुलगा असा परिवार असून, पती त्रास देत असल्यामुळे गेल्या १५ दिवसांपूर्वीच ती आपल्या आई-वडिलांकडे राजुरी येथे राहण्यास आली होती. त्यानंतर पतीचा सतत फोन येणे व धमकावणी देणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे या तरुणीने पतीविरुद्ध पोलिसात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला.

परंतु नातेवाइकांनी तिला फिर्याद देऊ दिली नाही. त्यानंतर तिच्या मनात नैराश्य निर्माण झाल्याने १४ सप्टेंबर रोजी दुपारी राजुरी येथील घर सोडून गेली. तिची मोठी मुलगी दहावीला, दुसरी आठवीला, तिसरी पाचवीला, मुलगा पहिलीला तर शेवटची मुलगी बालवाडीत आहे. ही सर्व मुले तिच्या माहेरचे लोकच सांभाळत आहेत. सुरुवातीला ती सासरी गेली असेल असे माहेरच्यांना वाटले, परंतु ती सासरी गेली नाही, हे समजल्यावर वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस शोध घेत आहेत.

----

Web Title: The woman left her five children after a quarrel with her husband