शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साडीचा पदर ट्रॅक्टरच्या ब्लोअर राॅडमध्ये अडकून डाळिंब झाडांना स्लरी सोडणाऱ्या महिलेचा मृत्यू

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 13, 2023 20:51 IST

याबाबत पती प्रवीण तातोबा येलपले यांनी पोलिसात खबर दिली आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यूने अजनाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापूर: डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडताना ब्लोअरच्या राॅडमध्ये साडीचा पदर अडकून गळफास बसल्याने पत्नीचा पतीदेखत मृत्यू झाला.प्रियांका प्रवीण येलपले (२९़, रा. अजनाळे, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव असून रविवार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अजनाळे येथे ही घटना घडली.

याबाबत पती प्रवीण तातोबा येलपले यांनी पोलिसात खबर दिली आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यूने अजनाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पती प्रवीण येलपले व पत्नी प्रियांका हे दोघे मिळून रविवारी शेतातील डाळिंब बागेत आले. ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या सहाय्याने डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडत होते. दरम्यान प्रवीण येलपले पुढे बघून ट्रॅक्टर चालवीत होते.

पत्नी प्रियंका ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या सहाय्याने झाडांना स्लरी ओतत होत्या. इतक्यात ब्लोअर ढवळणी राॅडला प्रियांकाच्या साडीचा पदर गुंडाळून तिला गळफास लागला आणि ट्रॅक्टर जाम चालू लागला. इतक्यात प्रवीण याने पाठीमागे वळून पाहिले असता प्रियांकाच्या गळ्याला साडीचा गळफास बसल्याचे दिसून आले. प्रवीणने ट्रॅक्टर थांबवून प्रियंकाच्या गळ्याला बसलेला साडीचा गळफास काढला व उपचाराकरता तिला तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मुत्यू झाल्याचे जाहीर केले.

टॅग्स :WomenमहिलाDeathमृत्यूFarmerशेतकरीSolapurसोलापूर