महिलेने मागितली पन्नास लाखांची खंडणी; कारण सांगितले, प्रियकर फोन उचलत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:45+5:302021-09-02T04:48:45+5:30
------ सोलापूर : प्रियकर फोन उचलत नाही, त्याला फोन उचलायला सांगा, अन्यथा अत्याचार केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करते, नाही ...

महिलेने मागितली पन्नास लाखांची खंडणी; कारण सांगितले, प्रियकर फोन उचलत नाही
------
सोलापूर : प्रियकर फोन उचलत नाही, त्याला फोन उचलायला सांगा, अन्यथा अत्याचार केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करते, नाही तर मला पन्नास लाख रुपये द्या, अशी धमकी एका महिलेने दिल्याची तक्रार वळसंग पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
अनिल वामन राठोड (वय ३८, नाईकनगर तांडा, वळसंग) यांनी वळसंग पोलीस ठाण्यात एका महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. अनिल राठोड हे आपल्या शेतात काम करीत असताना ही महिला त्याच्याकडे आली. तुझ्या भावाबरोबर माझे प्रेमसंबंध आहेत, तो माझा फोन उचलत नाही. त्याला फोन उचलायला सांग, असे तावातावाने म्हणाली. अनिल राठोड याने भावाला फोन लावला असता त्याचा फोन बंद होता. महिलेला त्याचे म्हणणे खरे वाटले नाही. तू मुद्दाम करत आहेस, त्याचा फोन लागत नाही, असे खोटे बोलतोस म्हणून तिने त्याला दमदाटी सुरू केली. दुसऱ्या दिवशी हीच महिला पुन्हा अनिल राठोड यांच्याकडे गेली. तिच्या सोबत अन्य एक अनोळखी व्यक्ती होती. यावेळी महिलेने अनिलच्या आईला शिवीगाळ केली. तिच्या सोबत आलेल्या अनोळखी व्यक्तीने धक्काबुक्की केली. अक्कलकोटला आलास, तर तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक फौजदार जमादार हे करीत आहेत.
..............
प्रेमसंबंध होतं, पण तिचं वागणं बरोबर नाही
पहिल्या दिवशी फोन न लागण्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा भावाला फोन लावण्यासाठी महिलेने आग्रह केला. तेव्हा त्याच्या भावाने फोन उचलला. आमच्यातील प्रेमसंबंध होते; परंतु तिचे वागणे व्यवस्थित नसल्याने मी तिच्यासोबतचा संपर्क तोडला आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर या महिलेने तू मला पन्नास लाख रुपये दे, नाहीतर तुझ्या भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते, अशी धमकी दिली. त्यांचे राहते घर खाली करण्यास सांगितले.