कोंबडीच्या कारणावरुन महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:22 IST2021-05-23T04:22:22+5:302021-05-23T04:22:22+5:30

बार्शी : कुत्र्याने कोंबडी नेल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन बार्शी तालुक्यात एका गावात महिलेला ११ जणांनी मिळून मारहाण करून ...

Woman beaten for chicken pox | कोंबडीच्या कारणावरुन महिलेला मारहाण

कोंबडीच्या कारणावरुन महिलेला मारहाण

बार्शी : कुत्र्याने कोंबडी नेल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन बार्शी तालुक्यात एका गावात महिलेला ११ जणांनी मिळून मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडला.

याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी लखन रामचंद्र मुंढे, रामराव मुंढे, सुरेश मुंढे, रवींद्र मुंढे यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी लखन मुंढे याच्या कुत्र्याने पीडित महिलेची कोंबडी नेली होती. पीडितेनेे फोन करून लखनला बोलावून घेतले. तो तिच्या घरी येताच त्याने शिवीगाळ केली. पीडित महिला ही पोलिसात तक्रार देण्यासाठी निघालेली असताना त्याने तिला अडवून शिवीगाळ करत पाईपने मारहाण केली. यावेळी पीडितेचा मुलगा सोडविण्यास आला असता त्यालाही मारहाण करून जखमी केले. दरम्यान सुरेश मुंढे व रवींद्र मुंढे या दोघांनी पीडितेचा विनयभंग केला. अधिक तपास फौजदार प्रवीण जाधव करत आहेत.

Web Title: Woman beaten for chicken pox