तीन लाखांचे दागिने चोरलेल्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:22 IST2021-04-16T04:22:16+5:302021-04-16T04:22:16+5:30

अधिक माहिती अशी, फिर्यादी गोपाळ पाटील यांचा भाऊ कृष्णाचे लग्न लताबाई हिंगे यांनी मध्यस्थीने जमवले होते. साखरपुडा होऊन मे ...

Woman arrested for stealing jewelery worth Rs 3 lakh | तीन लाखांचे दागिने चोरलेल्या महिलेस अटक

तीन लाखांचे दागिने चोरलेल्या महिलेस अटक

अधिक माहिती अशी, फिर्यादी गोपाळ पाटील यांचा भाऊ कृष्णाचे लग्न लताबाई हिंगे यांनी मध्यस्थीने जमवले होते. साखरपुडा होऊन मे महिन्यात लग्न करण्याचे ठरले. दरम्यान वडील आजारी असल्याने फिर्यादी सोडून सर्व बार्शी येथील दवाखान्यात गेले होते. त्यामुळे आरोपी लताबाई गोपाळला जेवणाचा डबा घरी नेऊन देत असे. दरम्यान, लताबाईच्या समक्ष लग्नाचे सोने खरेदी केले होते. तिचा घरी वावर वाढला होता. त्यात वडील दवाखान्यात असल्याचा गैरफायदा घेत व गोपाळ घरी नसल्यामुळे घरात डब्बा ठेवण्याचा बहाणा करून घराची चावी मागून घेतली. गोपाळ बाहेर गेला की लगेच तिने कुलूप उघडून घरातील सोन्याच्या तीन तोळ्याच्या पाटल्या, दोन तोळ्याचे लॉकेट, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या असा एकूण सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. याबाबत लताबाईवर मंगळवार रोजी गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विनय बहिर, पोलीस काॅन्स्टेबल नाळे, पाडिळे, रामहुंडे, खलाटे, माळी यांनी तपास करून आरोपीस तीन दिवसात अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Woman arrested for stealing jewelery worth Rs 3 lakh