शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची साक्षी शेलार ताराराणी चषकाची मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 15:55 IST

अकलूज : शंकरनगर-अकलूज येथे शिवतीर्थ आखाड्यात प्रथमच भरविण्यात आलेल्या महिलांच्या ताराराणी चषक कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या साक्षी शेलारने सुरवड (ता. ...

ठळक मुद्देया स्पर्धेतील अंतिम फेरीत ताराराणी चषकासाठी पुण्याच्या साक्षी शेलार व सुरवडच्या गीतांजली पांढरे यांच्यात झुंज१५ मिनिटे बेमुदत निकाली सुरू झालेल्या कुस्तीत दोन्ही कुस्ती पटुंनी एकमेकांचे डाव व ताकदीचा अंदाज घेत डावपेच टाकले

अकलूज : शंकरनगर-अकलूज येथे शिवतीर्थ आखाड्यात प्रथमच भरविण्यात आलेल्या महिलांच्या ताराराणी चषक कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या साक्षी शेलारने सुरवड (ता. इंदापूर, जि. पुणे) च्या गीतांजली पांढरेवर गुणांवर मात करत ताराराणी चषकावर आपले नांव कोरत पहिला ताराराणी चषक पटकाविला.

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, महाशिवरात्र यात्रा समिती व प्रताप क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांची १०१ वी जयंती, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची ५१ वी पुण्यतीथी व खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ आखाड्यात वजन गट, त्रिमुर्ती चषक व ताराराणी चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेत यंदा प्रथमच महिलांच्या ताराराणी चषक कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. 

या स्पर्धेतील अंतिम फेरीत ताराराणी चषकासाठी पुण्याच्या साक्षी शेलार व सुरवडच्या गीतांजली पांढरे यांच्यात झुंज लागली. १५ मिनिटे बेमुदत निकाली सुरू झालेल्या कुस्तीत दोन्ही कुस्ती पटुंनी एकमेकांचे डाव व ताकदीचा अंदाज घेत डावपेच टाकले. १५ मिनिटांत दोघींचे गुण न झाल्याने आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमानुसार वाढिव ६ मिनिटे देण्यात आली.त्यातील ३ मिनिटांच्या पहिल्या फेरीत साक्षीने २ गुण व गीतांजलीने २ गुण मिळवले. दोघींचे पहिल्या फेरीत समान गुण राहिले. दुस-या ३ मिनिटांच्या निर्णायक फेरीत साक्षीने गीतांजलीवर मात करत २ गुणांची निर्णायक आघाडी घेताना आपल्या हुकूमी डावावर दुहेरी पट काढून गीतांजलीवर मात केली व ताराराणी चषक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना सहकार महर्षि साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, यात्रा समितीचे कार्याध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील,   शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते ताराराणी चषक व रोख बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेसाठी प्रमुख म्हणून राम सारंग, आखाडा प्रमुख नितीन शिंदे, सरपंच तानाजी केसरे, साईड पंच अभिजित माने, वेळाधिकारी अनिल बाबर यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचे समालोचन सर्जेराव मोटे, बाजीराव पाटील यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणे