मुलाच्या मृत्यूृने अर्ध्या तासातच आईचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST2021-05-06T04:23:28+5:302021-05-06T04:23:28+5:30

टेंभुर्णी येथील इक्बाल उर्फ फिरोज महंमद हनीफ शेख (वय २९) व रुक्साना महंमद हनीफ शेख (वय ५५) या मायलेकरावर ...

Within half an hour of the child's death, the mother also died | मुलाच्या मृत्यूृने अर्ध्या तासातच आईचाही मृत्यू

मुलाच्या मृत्यूृने अर्ध्या तासातच आईचाही मृत्यू

टेंभुर्णी येथील इक्बाल उर्फ फिरोज महंमद हनीफ शेख (वय २९) व रुक्साना महंमद हनीफ शेख (वय ५५) या मायलेकरावर इंदापूर येथील एका खासगी रुग्णालयात एकाच रूममध्ये उपचार चालू होते. रुक्साना शेख यांची प्रकृती चांगली झाली होती. त्यांना एक दोन दिवसांत घरी सोडण्यात येणार होते, परंतु बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास मुलगा इक्बालची प्रकृती अचानक बिघडली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. डोळ्यादेखत एकुलत्या एका मुलाचा जीव गेल्याचे त्या माउलीला सहन झाले नाही. तिला प्रचंड धक्का बसला व अर्ध्या तासाच्या फरकातच तिनेही जीव सोडला.

दोन्ही मायलेकरांचा इंदापूर येथे एकाच ठिकाणी दफन विधी करण्यात आला. आठ दिवसांपूर्वी इक्बालचे वडील म. हनीफ मौला शेख (वय ६८ ) यांचे व सावत्र आई इलल्लाबी म. हनीफ शेख (वय ६५) यांचे पाच दिवसांपूर्वी कोरोनाने उपचार चालू असताना निधन झाले होते.

आठ दिवसांत होत्याचं नव्हतं

आठ दिवसांत या एकच कुटुंबातील चौघांचा कोरोनाने बळी घेतला. इक्बालचा भाऊ भैय्या शेख व त्याची पत्नी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्यावरही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. आठ दिवसांत एकाच घरातील चौघांचा कोरोनाने बळी घेतल्याने होत्याचं नव्हतं झाल्याने संपूर्ण टेंभुर्णी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

-----

Web Title: Within half an hour of the child's death, the mother also died