शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

कराल झाडांवर माया तर मिळेल दाट छाया...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:33 IST

सोलापुरातील पर्यावरणप्रेमींची हाक; फिरायला जाताना एक बाटली पाणी नेऊ या..  मोहिमेला मिळतोय सोलापूरकरांचा प्रतिसाद

ठळक मुद्देसोलापूर शहरामध्ये गेल्या २५ वर्षांपासून एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक तापमानाची तीव्रता अधिक भासतेयंदा मार्च महिन्यापासूनच उन्हानं आपला रौद्र अवतार दाखवण्यास सुरुवात केलीकोणी उद्युक्त न करता पर्यावरणाबद्दल, झाडांबद्दल उत्स्फूर्तपणे जाणीवजागृती होत असल्याचे सकारात्मक चित्र

विलास जळकोटकरसोलापूर: उन्हाची तगमग जास्तच वाढलीय.. शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतोय.. तोही अपुºया स्वरुपात.. माणसांची ही अवस्था मग शहर, कॉलनी, नगर परिसरातील झाडांचं काय? अशावेळी गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्थांकडून मॉर्निंग वॉकला जाताना एक लिटरची बाटली नेऊन नियमितपणे एका झाडाला पाणी ओतून उन्हाळ्यात ते जगवू या असा संक ल्प अंमलात आणत इतरांनाही उद्युक्त होण्यासाठी हाक दिली आहे. 

सोलापूर शहरामध्ये गेल्या २५ वर्षांपासून एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक तापमानाची तीव्रता अधिक भासते. यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हानं आपला रौद्र अवतार दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी पाण्यासाठी प्रत्येकांनाच संघर्ष करावा लागतो. हे नित्याचं चित्र या काळात जाणवते. मनुष्यप्राणी आपली तहान भागवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तो मिळवतो; मात्र मुके प्राणी, ज्या झाडांकडून आपणास जगण्यासाठी आवश्यक असणारे आॅक्सिजन मिळते त्या झाडांचं काय? हा प्रश्न गेल्या काही अनेक वर्षांपासून पर्यावरणाचा जागर करणाºया नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल, वन्यजीवप्रेमी संस्था, युको नेचर क्लब, युको फ्रेंडली, निसर्ग माझा सखा अशा कितीतरी संस्था आपापल्या परीनं हे काम करताहेत.

आता यांनी यामध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना किमान १ लिटर पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडावे. रस्त्याच्या कडेने नागरिकांकडून व शासनाच्या यंत्रणेकरवी नवीन रोपे लावण्यात आली आहेत. त्यांना नियमित पाणी कोण देणार हा विचार न करता सामाजिक बांधिलकी म्हणून एक पाऊल आपण सर्वांनी उचलू या, असे आवाहन करणारे पत्रक नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल होत आहे. 

कोणी उद्युक्त न करता पर्यावरणाबद्दल, झाडांबद्दल उत्स्फूर्तपणे जाणीवजागृती होत असल्याचे सकारात्मक चित्र सोलापूर शहरात दिसू लागले आहे. ‘स्मार्ट सोलापूर’च्या स्मार्ट नागरिकांच्या जाणिवांमुळे हरित सोलापूर या चळवळीस निश्चित बळ मिळेल, अशाही प्रतिक्रिया शहरवासीयांमधून उमटू लागल्या आहेत. 

काय म्हणताहेत पर्यावरणप्रेमी

  • - निसर्गाचा समतोल राखला जावा. पशुप्राणीही गुण्यागोविंदाने नांदले जावेत यासाठी नेचर कॉन्झर्व्हेशन नेहमीच कार्यरत आहेत. पशुपक्ष्यांशिवाय हरितक्रांती सोलापूरसाठी प्रत्येकांनीच एक पाऊल पुढे उचलले पाहिजे या भावनेतून आमचे काम सुरु आहे, आपणही सहभागी व्हा, अशी भावना पर्यावरणप्रेमी संतोष धाकपाडे यांनी व्यक्त केली.
  • - सद्गुरु परिवार, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आध्यात्मिक जागर करतो. बाळे परिसरात मी दररोज बादलीभर पाणी झाडे जगवण्यासाठी घालतो. आपणही घालावे, अशी प्रतिक्रिया पन्नासी ओलांडलेल्या दादाराव कुचेकर यांनी व्यक्त केली. 
  • - पाणी हे प्रत्येकाच्या आयुष्यात जगण्यासाठी अविभाज्य घटक आहे. जसं माणसांना त्याची गरज आहे तशीच झाडांनाही आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचे काम करणाºया आपणास जगण्यासाठी आॅक्सिजनच्या रुपामध्ये मोकळा श्वास पुरवणाºया झाडांना आपण साºयांनीच या उन्हाळ्यात जगवण्याची गरज असल्याच्या भावना निसर्ग माझा सखाचे अरविंद म्हेत्रे, युको नेचर क्लबचे मनोज देवकर यांनी व्यक्त केल्या. 

वृक्षांनाही लागते तहान!

  • - उन्हाळा आला की, प्रत्येक जण पाण्यासाठी आटापिटा करतो. घशाला कोरड लागली की लागलीच पाण्यासाठी धावा करतो. मग वृक्षांचंही तसंच आहे. त्यांनाही तहान लागते तुमच्या-आमच्यासारखी, पटतंय ना..! चला तर मग आपण साºयांनीच मिळून त्यांची तहान भागवू या, असे आवाहन वेकअप सोलापूर फाउंडेशनचे अध्यक्ष  मिलिंद भोसले यांनीही केले आहे. 

उत्स्फूर्त सहभाग

  • - पर्यावरण, निसर्गाबद्दल आपुलकी असणाºया अनेकांनी आपल्या नावाचा कोठेही उल्लेख न करता आपापल्या परिसरातील झाडे जगवण्यासाठी किमान १ बाटली पाणी नियमित देण्याचे आवाहन करणारी हजारो पत्रके शहरात वाटली जात आहेत. सोशल मीडियावरही ती व्हायरल झाली आहेत. या पत्रकात म्हटले आहे, कोणत्याही एका झाडाची निवड करा. त्याला नियमित पाणी द्या. या दोन महिन्यांसाठी (एप्रिल/मे) एवढी तसदी घ्याच. हा आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर हे काम न सोपवता आपण सहभागी होऊन आपले जीवन उज्ज्वल करा. कोणी दुसरा करेल  अशी भावना न ठेवता आपण स्वत: सहभागी होऊन परिसर हरित करु या, असं आवाहन करण्यात येत आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणTemperatureतापमानwater shortageपाणीटंचाई