जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याला मतदान करणार; आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली शपथ
By Appasaheb.patil | Updated: March 11, 2023 17:49 IST2023-03-11T17:49:26+5:302023-03-11T17:49:46+5:30
MLA Praniti Shinde : जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याला मतदान करणार..जो पक्ष जुन्या पेन्शनला विरोध करेल त्याला कोणत्याही निवडणुकीत मी माझे कुटुंबिय, मित्रपरिवार मतदान करणार नाही..आता आमचेही ठरले आहे

जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याला मतदान करणार; आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली शपथ
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सध्या जुन्या पेन्शनचा विषय चांगलाच गाजत आहे. या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी १४ मार्चपासून राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, शाळा, नगरपालिका यासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याबाबतची घोषणाही करण्यात आली आहे. त्यासंदर्भात सोलापुरात आयोजित एका बैठकीत आ. प्रणिती शिंदे यांनी एक आगळावेगळी शपथ घेतली.
जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याला मतदान करणार..जो पक्ष जुन्या पेन्शनला विरोध करेल त्याला कोणत्याही निवडणुकीत मी माझे कुटुंबिय, मित्रपरिवार मतदान करणार नाही..आता आमचेही ठरले आहे. आजपासून शपथ घेते की, जुन्या पेन्शनचा प्रचार अन् प्रसार करेल. जो पेन्शनला मत देईल त्यालाच आम्ही मतदान करू अशी शपथ आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली. शेवटी एकच मिशन..जुनी पेन्शन अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. यावेळी विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र सर्वत्र जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू असताना कालच महाराष्ट्राचे अर्थसंकल्प जाहीर झाला. त्या अर्थसंकल्पामध्ये जुन्या पेन्शनचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. ही बाब खूप गंभीर आहे. त्यामुळे या संपाची हाक देण्यात आले आहे. स्वतःच्या हक्काच्या पेन्शनसाठी सर्व शिक्षकांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आली.