शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिलाच्या तक्रारी कमी करून ग्राहकांना तत्पर सेवा देणार : प्रसन्न कुलकर्णी

By appasaheb.patil | Updated: September 9, 2019 16:41 IST

जनमित्रांसह शाखा अभियंत्यांचे मोबाईल नंबर झळकणार प्रत्येक कार्यालयात

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनीग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी आता शहरातील प्रत्येक ट्रान्स्फॉर्मर (डीपी) वर ठळक अक्षरात जनमित्रांचे पूर्ण नाव व त्याचा मोबाईल नंबर देण्यात येणार

आप्पासाहेब पाटील 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. ६ जून २००५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. सोलापूर शहरात महावितरणचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. ग्राहकांना मिळणाºया सेवासुविधा याबाबत नव्याने रूजू झालेले महावितरणचे शहर अभियंता प्रसन्न कुलकर्णी यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न: आपण यापूर्वी कोणकोणत्या पदावर काम केले आहे.उत्तर : मी मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहे़ मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर महावितरण कंपनीत शाखा अभियंता पदावर रूजू झालो़ मी यापूर्वी फलटण, वाई, पुणे, पुणे शहर, वसई, पालघर याठिकाणी विविध पदाचा कार्यभार सांभाळला आहे़ आता सध्या माझी सोलापूर शहर अभियंता (कार्यकारी) या पदावर नियुक्ती झाली आहे.

प्रश्न: ग्राहकांना तत्पर सेवा देण्याबाबत आपला कसा प्रयत्न असणार आहे.उत्तर : ग्राहकांना २४ तास सेवा देणे कंपनीचे कर्तव्य आहे़ त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असतो. अचानक काही कारणास्तव वीज बंद पडते अन् ग्राहकांच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी आता शहरातील प्रत्येक ट्रान्स्फॉर्मर (डीपी) वर ठळक अक्षरात जनमित्रांचे पूर्ण नाव व त्याचा मोबाईल नंबर देण्यात येणार आहे. त्यामुळे वीज गेल्यास संबंधित जनमित्रास ग्राहकांनी कळविल्यास अवघ्या ३० मिनिटात वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार आहे़ याशिवाय त्या त्या भागातील शाखा अभियंता व संबंधित जनमित्रांचे मोबाईल नंबर असलेले फलक शासकीय कार्यालयात लावण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे तत्पर सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

प्रश्न : महावितरणमध्ये सुधारणा काय काय होणार ?सध्या ग्राहकांकडून वीज बिल चुकीचे येत असल्याच्या तक्रारी येत आहेत़ या चुका सुधारून ग्राहकांना वेळेत व बरोबर बिल पाठविण्यासाठीच्या कामांना माझे पहिले प्राधान्य असणार आहे़ रिडिंग घेणाºया प्रक्रियेत सुधारणा करून त्यात जलद गतीचा कारभार करू़ लवकरच शहरात बदल होतानाचे दिसून येईल असेही कुलकर्णी यांनी सांगितले

कंपनीची ध्येय धोरणे व ग्राहकांचा मिलाफ घडविणारकंपनीचे काही नियम आहे़त. या नियमात बसून काम करताना ग्राहकांना या नियमानुसार जलद, तत्पर सेवा देण्याचे काम करणार आहे़ शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाºया नव्याने वीजजोडण्या, मीटर बदलणे, शेतीपंपासाठी जलद वीजजोडणी देण्यासाठी यापुढे काम करणार असल्याची माहिती प्रसन्न कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन