विकासकामात राजकारण करणार नाही : माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:18+5:302021-09-14T04:26:18+5:30
चळे : मोहोळ-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांमध्ये राजकारण करणार नाही. १० वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या १७ गावांचा विकास करणार असल्याचे ...

विकासकामात राजकारण करणार नाही : माने
चळे : मोहोळ-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांमध्ये राजकारण करणार नाही. १० वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या १७ गावांचा विकास करणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले. सरकोली (ता. पंढरपूर) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य व्यंकटराव भालके होते. सरकोली येथे २५१५ योजनेअंतर्गत ५५ लाख, आमदार फंडातून १० लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले आहेत. या निधीतून अंबिकानगर रस्ता, सरकोली-देशमुखपाटी ते खटकाळेवस्ती, शिवाजीनगर रस्ता आदी कामे करण्यात येणार आहेत. यावेळी दत्तात्रय भोसले, मोहन भोसले, सरपंच शिवाजी भोसले, उपसरपंच भास्कर भोसले, पांडुरंग भोसले, हरिदास भोसले, सिद्धेश्वर भोसले, तानाजी भोसले, सोमनाथ भोसले, संग्राम भालके, महेश बेदरे, शरद भोसले, जीवन भोसले, उपअभियंता मुकडे, कांबळे, सचिन पाटील, महेश पवार आदी उपस्थित होते.