शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त गुडेवार परत येणार का?

By admin | Updated: May 6, 2014 23:45 IST

सर्वस्तरातून होतेय गुडेवारांचे समर्थन

सर्वस्तरातून होतेय गुडेवारांचे समर्थनसोलापूर: दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्ताचा पदभार सोडून गेलेले मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे पुन्हा महापालिका सेवेत येणार का, त्यांच्याबद्दल शासनस्तरावर कोणता निर्णय होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे़ मंगळवारी दिवसभर शहरात विविध ठिकाणी गुडेवारांच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात आली़माकप, बसपा आणि डाव्या आघाडीने मंगळवारी सायंकाळी मनपासमोर निदर्शने केली तर मनपा कर्मचार्‍यांनी सकाळी आंदोलन केले़ गुडेवार यांनी शासनाकडे बदलीची मागणी करुन आपला पदभार सहायक आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे सोपविला आहे़ त्यामुळे शासन पातळीवर काय निर्णय होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे़ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या देखील काही सदस्यांचा छुपा पाठिंबा गुडेवारांच्या पाठीशी आहे़ विशेष म्हणजे काल केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे पाच सदस्य सहभागी झाले होते़ या दोन्ही पक्षात फूट पडली आहे़गुडेवारांच्या विरोधी आंदोलनकर्त्यांमध्ये आ़ प्रणिती शिंदे आणि कोठे गटाचे नगरसेवक होते. मात्र आ़ दिलीप माने गटाच्या नगरसेवकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली़ गुडेवारांमुळे आमच्या प्रभागात मोठा निधी मिळाला, कामेही होऊ लागली आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नगरसेवक गुडेवारांच्या पाठीशी छुप्या पद्धतीने आहेत़ चौकट़़़कर्मचार्‍यांचे आंदोलनमहापालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने गुडेवार यांच्या समर्थनार्थ मंगळवारी सकाळी ११ वाजता एक तास आंदोलन केले़ बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला होता. एक तास आंदोलन केल्यानंतर जनतेला वेठीस धरु नका असे आयुक्त गुडेवार यांनी सांगितल्यामुळे मनपा कर्मचार्‍यांनी आपले काम सुरू केले़ आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी सांगितले़ चौकट़़़सोलापूर बचाव कोणत्याही राजकीय पक्षाशिवाय काही उद्योजक, व्यापारी व शहर प्रेमी नागरिक एकत्र आले असून त्यांनी गुडेवारांच्या समर्थनार्थ बुधवारी सायंकाळी पाच वाजता चार पुतळा येथे निदर्शने आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे़ शहरात स‘ांची मोहीम राबविणे, गुडेवारांची बदली करु नये यासाठी शासनाला पत्रे पाठविणे आदी मोहिमा राबविण्याचे ठरविले आहे़ तिसरी आँख ‘ुमन राईट्स संघटनेचे विजयकुमार डिग्गे यांनी तसेच ई सोलापूर डॉट कॉमचे सादिक दारुवाला यांनी देखील शासनाकडे गुडेवारांची बदली करु नये, अशी मागणी केली आहे़