शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यभर सांभाळण्याची ग्वाही घेऊन पत्नीला केले पतीच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 14:12 IST

मोहोळ पोलीस ठाण्यात समुपदेशन; आहेर करून पोलीसांनी केला जोडीदारांचा सन्मान

ठळक मुद्देसमुपदेशनानंतर रोहित प्रियंकाला स्वीकारण्यास तयार झालानातेवाईकांसमक्ष एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून विवाह केलापती-पत्नीस नवीन कपड्यांचा आहेर घेऊन त्यांचा पोलिसांनी सन्मान केला

लांबोटी : आयुष्यभर सांभाळण्याची ग्वाही घेऊन पत्नीला पतीच्या स्वाधीन केले़ मोहोळ पोलिसांनी दोघांचा संसार सुरळीत करण्यासाठी समुपदेशन करून सामाजिक काम केले आहे. १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे. यावेळी प्रियंका चंदनशिवे व रोहित गायकवाड यांचा आहेर करून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्यांचा सन्मान केला.

प्रियंका चंदनशिवे व रोहित गायकवाड हे दोघेही लांबोटी (ता. मोहोळ ) येथील एकमेकाशेजारचे रहिवासी आहेत. शेजारच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनंतर रोहितने प्रियंकाला विवाह करण्याचे आश्वासन दिले. 

काही दिवस गेल्यानंतर प्रियंकाने रोहितच्या मागे कधी विवाह करायचा, असा लकडा लावला. मात्र रोहितने अचानक विवाहास नकार दिला़ दुसरीकडे प्रियंकाच्या चुलता-चुलतीनेही या विवाहास  नकार दिल्यामुळे प्रियंका ही मनाने खचली. दोन महिने वाट पाहिल्यानंतर प्रियंकाने मोहोळ पोलीस ठाण्यात रोहितच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला. अर्जाची चौकशी सुरू झाली़ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस कॉन्स्टेबल अनुसया बंडगर यांनी दोघांनाही बोलावून त्यांचे समुपदेशन केले.

समुपदेशनानंतर रोहित प्रियंकाला स्वीकारण्यास तयार झाला. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून  मोहोळ येथील चंद्र्रमौळी गणेश मंदिरात ३० रोजी मोजक्या नातेवाईकांसमक्ष एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून विवाह केला. या नवोदित पती-पत्नीस नवीन कपड्यांचा आहेर घेऊन त्यांचा पोलिसांनी सन्मान केला. 

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या यशोदा कांबळे, बी. जी. चंदनशिवे, भाऊ चंदनशिवे यांच्यासह मुला-मुलीकडील नातेवाईक उपस्थित होते. प्रियंकाची आई लहानपणी दिवंगत झाली आहे तर वडील वृद्ध आहेत़ भावाने तिचा सांभाळ केला आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस