पत्नी निघून गेली, पतीची सासरवाडीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:31+5:302021-05-15T04:20:31+5:30

धायटी येथील शशिकांत आत्माराम शिंदे यांची मुलगी मोनाली हिचा महावीर रमेश भोसले (रा. सरड, ता. फलटण) यांच्याशी १५ ...

Wife left, husband commits suicide in Sasarwadi | पत्नी निघून गेली, पतीची सासरवाडीत आत्महत्या

पत्नी निघून गेली, पतीची सासरवाडीत आत्महत्या

धायटी येथील शशिकांत आत्माराम शिंदे यांची मुलगी मोनाली हिचा महावीर रमेश भोसले (रा. सरड, ता. फलटण) यांच्याशी १५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दरम्यान ७ वर्षांपासून मुलगी मोनाली व जावई महावीर भोसले हे शशिकांत शिंदे यांच्याकडे धायटी येथे राहत होते. दरम्यान ९ मे रोजी पत्नी मोनाली महावीर भोसले ही घरातून निघून गेल्याने पती महावीर भोसले यांनी सांगोला पोलिसात खबर दिली होती. दरम्यान १२ मे रोजी रात्री ८ वाजता महावीर भोसले हे जेवण करून घरात झोपले होते. पहाटे ५ च्या सुमारास शशिकांत शिंदे हे झोपेतून पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांना जावई महावीर भोसले याने घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत, शशिकांत आत्माराम शिंदे यांनी पोलिसात खबर दिली.

Web Title: Wife left, husband commits suicide in Sasarwadi