कोळेगाव पाटीजवळ कार-दुचाकीच्या धडकेत पत्नी ठार; पती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:34 IST2021-02-23T04:34:35+5:302021-02-23T04:34:35+5:30

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनार्धन हरिदास मोटे व राधिका जनार्धन मोटे हे पती-पत्नी दुचाकीवर (एम. एच. १३, डी. एल. ...

Wife killed in car-bike collision near Kolegaon Pati; Husband injured | कोळेगाव पाटीजवळ कार-दुचाकीच्या धडकेत पत्नी ठार; पती जखमी

कोळेगाव पाटीजवळ कार-दुचाकीच्या धडकेत पत्नी ठार; पती जखमी

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनार्धन हरिदास मोटे व राधिका जनार्धन मोटे हे पती-पत्नी दुचाकीवर (एम. एच. १३, डी. एल. ४४९८) वरून मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. तर त्याचवेळी कार (एम. एच. १२, एन. बी. ३१९६) पाठीमागून त्याच दिशेने जात होती. दोन्ही वाहने कोळेगाव फाट्याजवळ येताच कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात राधिका जनार्धन मोटे (३८, रा. नरखेड, ता. मोहोळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जनार्धन हरिदास मोटे (४५) हे जखमी झाले. जखमींना तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या पथकाने व टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: Wife killed in car-bike collision near Kolegaon Pati; Husband injured