विधवा महिलेचा विनयभंग करून केली दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:31+5:302021-06-16T04:30:31+5:30

१३ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास सांगोला तालुक्यात ही घटना घडली. संबंधित विधवा महिला ही वडिलांना घेऊन आली. ...

The widow was raped | विधवा महिलेचा विनयभंग करून केली दमदाटी

विधवा महिलेचा विनयभंग करून केली दमदाटी

१३ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास सांगोला तालुक्यात ही घटना घडली.

संबंधित विधवा महिला ही वडिलांना घेऊन आली. पेरणी करावयाची असल्याने गावातील एका व्यक्तीचा ट्रॅक्टर सामाईक वाटेवरून घेऊन जात होती. त्यावेळी बाळू निकम, रामा गिड्डे, सचिन आवताडे व अनोळखी व्यक्ती असे चाैघे एकत्रित आले.

त्यांच्यापैकी दोघांनी या वाटेवरून जायचे नाही म्हणून ट्रॅक्टर अडविला. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. पीडित महिला ही रस्ता हा बऱ्याच वर्षांपासून वहिवाटीचा आहे असे त्यांना समजावून सांगत होती. यावेळी ‘तुला आता सोडत नाही असे म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करू लागले. त्यावेळी वडील तुकाराम शिंदे हे मुलीला समजावून सांगत पेरायचे राहू दे असे म्हणून तिला घरी घेऊन चालले होते. यावेळी त्या चाैघांनी परत या वाटेवर आलीस आणि पोलीस ठाण्याला गेलीस तर मुलाला जिवंत सोडणार नाही अशी दमदाटी केली. यानंतर पीडित महिलेने सांगोला पोलिसांत धाव घेतली.

Web Title: The widow was raped