शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनी चोरट्यांच्या का रे...देवाची दानपेटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 20:56 IST

सोलापुरात रात्रीच्या वेळी मंदिरात घरफोडी करणाºया दोन चोरट्यांना अटक

ठळक मुद्दे शहरातील घरफोडी व मंदिराची दानपेटी फोडल्याच्या घटना घडल्या होत्यासहायक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, ऋषिकेश पवन व पथकांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलेपंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी मार्कंडेय नगर येथे  उघड्या घरातून मोबाईल व पाण्याची मोटार चोरल्याची कबुली दिली

सोलापूर : रात्रीच्या वेळी मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरी करणाºया, घरफोडी करणाºया दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. पकडण्यात आलेल्यांकडून चार गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून १२ हजार १४0 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

मुकेश किसनसिंग बोधीवाले (वय २३, रा. शीतलादेवी चहा कॅन्टीनजवळ, बेडर पूल, सोलापूर), नागेश भीमप्पा शिपरी (वय २४, रा. कोंचीकोरवे गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरातील घरफोडी व मंदिराची दानपेटी फोडल्याच्या घटना घडल्या होत्या. चोरीतील संशयित हे चोरीचा माल विकण्यासाठी मौलाली चौकाकडून सिद्धार्थ चौकाकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, ऋषिकेश पवन व पथकांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

दोघांकडे चौकशी केली असता, पंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी मार्कंडेय नगर येथे  उघड्या घरातून मोबाईल व पाण्याची मोटार चोरल्याची कबुली दिली. कुमठा नाका येथील मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता सोनीनगर हुडको आणि जुने होमगार्ड मैदान येथील स्काऊट गाईडच्या कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस