जेवायला बाहेर का गेला म्हणून भावास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:21 IST2021-03-28T04:21:39+5:302021-03-28T04:21:39+5:30

वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हळदुगे येथील अमोल महादेव मोहिते हे वडील महादेव मोहिते, भाऊ कृषी सहाय्यक अविनाश ...

Why did you go out to eat? | जेवायला बाहेर का गेला म्हणून भावास मारहाण

जेवायला बाहेर का गेला म्हणून भावास मारहाण

वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हळदुगे येथील अमोल महादेव मोहिते हे वडील महादेव मोहिते, भाऊ कृषी सहाय्यक अविनाश मोहिते व भावजय कविता यांच्यासह गावातच एकत्र राहतात. मात्र भाऊ व भावजय सतत त्रास देतात त्यामुळे गावातच असणाऱ्या आत्या मंगल जगताप यांच्याकडे अमोल जेवतो व व घरी झोपायला जातो.

नेहमी प्रमाणे शुक्रवारी रात्री आठ वाजता अमोल जेवायला गेला होता. यावेळी त्यांच्या आत्याची मुले मदन व नारायण यांच्या मोबाईलवर भाऊ अविनाश यांचा फोन आला व अमोलला जेवण देवू नका म्हणून सांगितले. तरीही त्यांचे जेवण झाले होते. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता आत्याकडे येऊन भावाला जेवायला का दिले असे म्हणत, अमोलला बेदम मारहाण केली. यामध्ये उजव्या हाताचे हाड मोडले असून ग्रामीण रूग्णालयात उपचार घेतले आहेत, अशी फिर्याद अमोलने वैराग पोलीस स्टेशनला दिली. याबाबदचा अधिक तपास फौजदार राजेंद्र राठोड हे करत आहेत.

----

Web Title: Why did you go out to eat?