शेतकऱ्यांचा उद्रेक भडकत असताना मुख्यमंत्री गप्प का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST2021-05-27T04:23:32+5:302021-05-27T04:23:32+5:30
भीमानगर : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी उजनीनिर्मिती करताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती. परंतु बारामतीकरांनी ...

शेतकऱ्यांचा उद्रेक भडकत असताना मुख्यमंत्री गप्प का?
भीमानगर : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी उजनीनिर्मिती करताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती. परंतु बारामतीकरांनी हे पाणी आठमाही नाही, तर सहामाहीवर आणले. ते करूनही भागले नाही की काय म्हणून उजनी धरणातील सांडपाण्याच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी इंदापूरला पर्यायाने बारामतीला नेण्याचा घाट घातला आहे. असाच छळ बारामतीकरांनी सोलापूर जिल्ह्याचा सुरू केला असल्याचा आरोप जनहित संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी केला आहे.
या निर्णयास सबंध सोलापूर जिल्ह्यात विरोध होत असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी पेटून उठले आहेत. त्यावर कहर म्हणजे उपमुख्यमंत्री-जलसंपदामंत्री यांनी सातत्याने घूमजाव करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना संतप्त करायचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणात आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासाहेब गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले, अमोल पाटील, अकोले बु.चे सरपंच सतीश आबा सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रा.पं. सदस्य कल्याण नवले, रमेश पवार, तुषार पाटील, सुजीत दरगुडे या वेळी उपस्थित होते.
----