शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?

By अक्षय शितोळे | Updated: October 10, 2024 21:53 IST

इच्छुकांच्या गर्दीतून शरद पवार हे माढा विधानसभेसाठी नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होऊ लागल्याने अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असल्याचं दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती असून माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी तीन बडे नेते इच्छुक असल्याचे समजते. यामध्ये विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं. मात्र लोकसभा निवडणुकीत या तालुक्याने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना मोठी आघाडी दिल्याने आमदार बबन शिंदे यांना विधानसभेची लढाई सोपी असणार नाही, हे निश्चित झाले. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच बबन शिंदे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेणार असून चिरंजीव रणजीत शिंदे हे निवडणूक रिंगणात असतील, अशी घोषणा केली. तसंच शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास हाती तुतारी घेऊ अन्यथा अपक्ष लढू, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर शिंदे पिता-पुत्राने शरद पवार यांची भेटही घेतली आहे.

दुसरीकडे, शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्या अभिजीत पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पवार यांची साथ सोडत साखर कारखान्यातील अडचणींमुळे महायुतीला साथ दिली होती. मात्र हेच अभिजीत पाटील हे माढ्यातून तुतारी हाती मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हेदेखील मागील काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर असून माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या गर्दीतून शरद पवार हे माढा विधानसभेसाठी नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात आणि कोणाच्या हाती तुतारी देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmadha-acमाढाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४