शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बेचाळीस पायºया चढून जाणार कोण? पूल नको आम्हाला.. आता बोगदा हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:45 IST

पुणे राष्ट्रीय महामार्ग : मडकी वस्ती रोडवर अपघाताच्या घटना सुरूच; लोकांना हवा आहे शॉर्टकट मार्ग

ठळक मुद्देपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे  चौपदरीकरण करण्यात आलेलोकांनी डिव्हायडरचा काही भाग फोडून व बॅरिकेडचे लोखंड तोडून स्वत:चा मार्ग करून घेतलाकामगार बससाठी कसरत करून रस्ता ओलांडून जातात

संताजी शिंदे 

सोलापूर : पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणानंतर वारद फार्मसमोरील रस्ता ओलांडत असताना अनेक नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे. हा धोका लक्षात घेऊन लोखंडी पूल बांधण्यात आला, मात्र बेचाळीस पायºया चढून जाणार कोण? असा प्रश्न करीत स्थानिक नागरिक आम्हाला बोगदा हवा, अशी मागणी करीत आहेत. शॉर्टकट मार्ग शोधत अनेक लोक जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत. 

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे  चौपदरीकरण करण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी रस्ता झाल्यानंतर या भागातील लोकांना वारद फार्म व मडकी वस्तीकडे ये-जा करता येत नव्हती. लोकांनी डिव्हायडरचा काही भाग फोडून व बॅरिकेडचे लोखंड तोडून स्वत:चा मार्ग करून घेतला. वारद फार्म व मडकी वस्तीकडील महिला व पुरुष सकाळी चिंचोळी एमआयडीसीला कामाला जात असताता. कामगारांना घेऊन जाण्यासाठी कंपनीच्या बस या मडकी वस्तीच्या सर्व्हिस रोडला थांबतात. कामगार बससाठी कसरत करून रस्ता ओलांडून जातात. या प्रयत्नामध्ये अनेक लोकांचे अपघात झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी याच भागात एका महिलेचा रस्ता ओलांडताना ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. स्थानिक नागरिक संतप्त झाल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी दोन्हीकडे तत्काळ गतिरोधक करण्यात आले. 

लोकांना जाण्या-येण्याची सोय व्हावी म्हणून तत्काळ या भागात लोखंडी पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ८0 लाख रुपये खर्च करून एल अ‍ॅन्ड टी कंपनीच्या वतीने भव्य असा लोखंडी पूल उभारण्यात आला आहे. पूल सध्या पूर्णपणे सुस्थितीत असून तो लोकांसाठी सुरू केला आहे. मात्र या पुलावर जाण्यासाठी लोकांना ४२ पायºया चढाव्या लागत आहेत. वृद्ध महिला व पुरुषांना पायºया चढणे शक्य होत नाही. लहान मुलांना घेऊन पायºया चढणे अशक्य होत आहे. तरुण मंडळीही पायºया चढून जाण्याऐवजी तत्काळ डिव्हायडरवरून उडी मारून पलीकडे जाणे पसंत करीत आहेत. पुलावरून मात्र दिवसभरातून एखाद्दुसरा माणूस जाताना दिसतो. 

दररोज एक अपघात निश्चित आहे..- सोलापूर-पुणे महामार्गावर जड वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. पूर्वी एकेरी मार्ग होता तेव्हा अनेक अपघात होत होते. चौपदरीकरणामुळे सध्या अपघाताचे प्रमाण कमी झाले असले तरी वारद फार्म, मडकी वस्ती व अन्य नगरांचा विकास या भागात झाल्याने स्थानिक नागरिकांचा वावर वाढला आहे. दोन्हीकडे असलेल्या सर्व्हिस रोडवर रिक्षा, बस किंवा अन्य वाहनांतून उतरल्यानंतर व वाहनात बसून जाण्यासाठी लोक रस्ता ओलांडत असतात. वेगाने येणारी वाहने धडकून अपघात होत आहेत. 

स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी पूल बांधण्यात आला आहे, मात्र तेवढ्या उंचावर चढणे वृद्ध इसम व महिलांना शक्य होत नाही. रस्ता होण्याअगोदरच या वारद फार्म व मडकी वस्तीला जोडण्यासाठी भुयारी मार्ग करणे आवश्यक होते. - सोहेल नदाफ, स्थानिक नागरिक

पुलावरून जाण्यासाठी कमीत कमी ५ ते ८ मिनिटांचा वेळ लागतो. या भागातील कामगारांना कंपनीची गाडी वेळेत पकडायची असते, म्हणून दुभाजकावरून अवघ्या २ ते ३ मिनिटात जाता येते. लोकांना कामाची गडबड असते. - सलीम शेख, स्थानिक नागरिक

पुलासाठी अनेक आंदोलने केली, प्रशासनाला जाग मात्र मडकी वस्ती येथील पुलाचे काम व्यवस्थित झाले नाही. मक्तेदाराने केलेल्या कामामुळे पावसाळ्यात लोक घसरुन पडण्याची शक्यता आहे. जुन्या पुलाखालून रस्ता केला आहे, मात्र स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेता बोगद्यासाठी आंदोलन करू.- आनंद चंदनशिवे, नगरसेवक

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्ग