शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भिमा येथे भीमसैनिकांवर सुरुवातीला दगडफेक कोणी केली यांची चौकशी करा ? हर्षवर्धन पाटील यांचा मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:28 IST

कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक करणारे कोण होते? भीमसैनिकांवर सुरुवातीला कोणी दगडफेक केली? याची चौकशी सरकारने करावी, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्तकेले.

ठळक मुद्देभाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सामाजिक ताणतणाव, वाद निर्माण झालेसरकारकडून समाजातील सर्व घटकांवर अन्याय होत आहेखड्डे बुजवायला पैसे नाहीत ते राज्य काय चालविणार ?माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

पंढरपूर- कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक करणारे कोण होते? भीमसैनिकांवर सुरुवातीला कोणी दगडफेक केली? याची चौकशी सरकारने करावी, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

पंढरपूर येथे खासगी कामानिमित्त आल्यानंतर माजी मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, डॉ. सुधीर शिनगारे उपस्थित होते. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सामाजिक ताणतणाव, वाद निर्माण झाले आहेत. सरकारकडून समाजातील सर्व घटकांवर अन्याय होत आहे.

कोरेगाव-भीमा येथे सुरुवातीला कोणी दगडफेक केली? का केली? या प्रश्नांची उत्तरे सरकारने शोधायला हवीत़ प्रकाश आंबेडकर यांनी ज्यांची नावे घेतली, त्यांची चौकशी व्हावी, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.-------------------खड्डे बुजवायला पैसे नाहीत ते राज्य काय चालविणार ?- ज्या सरकारला साधा रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवता येत नाही, जर खड्डा बुजवलाच तर त्याचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांनी काय राज्याचा विकास केला? समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करुन, लोकांच्या भावना भडकावून किती दिवस राज्य चालविणार, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सरकारला लगावला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBhima-koregaonभीमा-कोरेगाव