घरात माणसे असताना चोरट्याने शिताफीने मंगळसूत्र पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST2021-08-25T04:28:18+5:302021-08-25T04:28:18+5:30

वैराग : बार्शी तालुक्यातील भालगाव येथे घरात शिरुन ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व पाच हजारांची रोकड असा ...

While there were people in the house, the thief Shitafi snatched the Mangalsutra | घरात माणसे असताना चोरट्याने शिताफीने मंगळसूत्र पळवले

घरात माणसे असताना चोरट्याने शिताफीने मंगळसूत्र पळवले

वैराग : बार्शी तालुक्यातील भालगाव येथे घरात शिरुन ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व पाच हजारांची रोकड असा ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मंगळवारी पहाटे ही चोरी झाली. घरात माणसे असतानाही चोरट्यांनी शिताफीने ही चोरी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा नोंदला आहे.

यातील फिर्यादी उषाबाई बळीराम दराडे (वय ४९, रा. भालगाव, ता. बार्शी ) सोमवारी सायंकाळी आपल्या घरामध्ये झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात घुसून स्वयंपाक घरात ठेवलेल्या किटलीमधील तीस हजार रुपयांचे एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र व पाच हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वैराग पोलिसात गुन्हा नोंदला आहे.

----

Web Title: While there were people in the house, the thief Shitafi snatched the Mangalsutra