माझ्या बालकांना नेमके हवी तरी काय? पोषण आहार दशसूत्रीतून शोधाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:41+5:302021-09-03T04:22:41+5:30

कुसळंब : कुसळंब (ता. बार्शा) येथे राष्ट्रीय पोषण अभियानाच्या दशसूत्री या उपक्रमास बुधवारपासून प्रारंभ झाला. ३० सप्टेंबरपर्यंत हा उपक्रम ...

What exactly do my kids want? Attempts to find a nutritional diet from the decade | माझ्या बालकांना नेमके हवी तरी काय? पोषण आहार दशसूत्रीतून शोधाचा प्रयत्न

माझ्या बालकांना नेमके हवी तरी काय? पोषण आहार दशसूत्रीतून शोधाचा प्रयत्न

कुसळंब : कुसळंब (ता. बार्शा) येथे राष्ट्रीय पोषण अभियानाच्या दशसूत्री या उपक्रमास बुधवारपासून प्रारंभ झाला. ३० सप्टेंबरपर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे. यावर्षी या उपक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पोषण अभियान दशसूत्रीची जोड देण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी खोडवे उपस्थित होते.

या दशसूत्रीमध्ये ० ते ६ वयोगटातील लाभार्थी गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींसाठी पूरक आहार व लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, विशेष गृहभेटी कार्यक्रम शोध घेऊ या कुपोषित बालकांचा, चला करू या शाळेची पूर्वतयारी, माझ्या बालकांना नेमके हवे तरी काय, चर्चा यशोदा माताशी अशा प्रकारची दशसूत्री संपूर्ण महिनाभर राबविली जाणार आहे

आशाबाई चौधरी यांनी यावेळी उपस्थित माता भगिनींना आरोग्याबाबत काळजी कशी घ्यावी, कुपोषण, बालमृत्यू, उपजत मृत्यू, स्वच्छता अभियान व एकात्मिक बाल विकास योजनेची माहिती दिली.

यावेळी ग्रामसेवक शिवकुमार पायघण, उपसरपंच किशोर काशीद, कृष्णा काशीद, वैशाली नलावडे, शोभा पवार, मेघा पवार, साधना चौधरी, वनमाला चौधरी, आशा शिंदे, शुभांगी ननवरे, आरती ननवरे, साक्षी ननवरे, दीपाली ननवरे आदी महिला उपस्थित होत्या

----०२कुसळंब दशसूत्री

कुसळंब येथील अंगणवाडीत पोषण आहाराच्या दशसूत्री उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Web Title: What exactly do my kids want? Attempts to find a nutritional diet from the decade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.