मास्क देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:49 IST2021-02-05T06:49:43+5:302021-02-05T06:49:43+5:30

काही दिवसांपूर्वी इयत्ता नववीपासून शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र प्राथमिक शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर ...

Welcome students wearing masks | मास्क देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत

मास्क देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत

काही दिवसांपूर्वी इयत्ता नववीपासून शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र प्राथमिक शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर पालकांच्या संमतीपत्राने तालुक्यातील प्राथमिक शाळांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. विद्यार्थ्यांची उपस्थिती मध्यम असली तरी लवकरच शाळा सुरळीत सुरू होतील, अशी अशा शिक्षक व पालकांना वाटत आहे. तरंगफळ (ता. माळशिरस) येथील श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थ्यांना माजी सरपंच सुरेश तरंग यांनी मास्कचे वाटप केले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शांतीलाल तरंगे, जयवंत तरंगे, भानुदास तरंगे, गोरख जानकर, सुजित तरंगे, हनुमंत तरंगे, गणपत वाघमोडे, नारायण तरंगे, प्रशांत तरंगे, प्राचार्य संतोषकुमार शेंडगे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ::::::::::::::::::::::

विद्यार्थी शाळेत येताच मास्क देऊन स्वागत करताना शिक्षक व पालक.

Web Title: Welcome students wearing masks