शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वेलकम सोलापूरकर; ग्राहकांसाठी थर्मल स्क्रीनिंग अन् सॅनिटायझर टनेलची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:02 IST

उद्यापासून बाजारपेठ सुरू होणार : आर्थिक मंदीच्या काळात विशेष सूटही देण्याचा निर्धार

ठळक मुद्देसोलापूर शहर व जिल्ह्यातील काही दुकाने व इतर शोरुम्स लवकरच सुरू होणार असल्याने व्यापाºयांची, उद्योजकांची धावपळ सुरूसोलापुरातील कपड्यांच्या दुकानात तसेच इलेक्ट्रॉनिक्स शोरुम्समध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहेकोरोनापासून ग्राहकांचा बचाव करण्यासाठी दुकानदार सर्वतोपरी काळजी घेत आहेत

सोलापूर : शहर व जिल्ह्यातील काही दुकाने व इतर शोरुम्स लवकरच सुरू होणार असल्याने व्यापाºयांची, उद्योजकांची धावपळ सुरू झाली आहे. विशेष करून सोलापुरातील कपड्यांच्या दुकानात तसेच इलेक्ट्रॉनिक्स शोरुम्समध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. आपल्या शोरुममध्ये येणाºया ग्राहकांची थर्मल स्क्रीनिंगद्वारे टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच काही दुकानासमोर सॅनिटाईज टनेल उभारला आहे. कोरोनापासून ग्राहकांचा बचाव करण्यासाठी दुकानदार सर्वतोपरी काळजी घेत आहेत. 

काहींनी तर दिवसातून तीन-चारवेळा संपूर्ण दुकान, शोरुम सॅनिटाईज करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत मार्केटमध्ये अधिकाधिक ग्राहक यायला पाहिजेत आणि खरेदीचा आनंद घेतला पाहिजे याकरिता व्यापाºयांनी विविध योजना, सवलती, उपक्रम राबवत आहेत. इलेक्ट्रॉनिक शोरुममध्ये पूर्वी दहा ते पंधरा टक्के सूट मिळत होती. 

आता यापुढे भरघोस सूट देण्यात येणार आहे. २० ते ३० टक्क्यापर्यंत सूट देण्यात येणार आहे, असे व्यापारी सांगताहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकरिता फायनान्स उपलब्ध करणाºया कार्पोरेट कंपन्यांकडून देखील विविध आॅफर जाहीर झाल्या आहेत.

संपूर्ण शोरुम होईल तीनवेळा निर्जंतुकीकरणशोरुमसमोर आम्ही सॅनिटाईज टनेल उभारला आहे. शोरुममध्ये येणाºया ग्राहकांना गरम पाणी प्यायला देणार आहोत, तेही कागदी ग्लासमध्ये. तसेच ग्राहकांना टोकन नंबर देणार आहोत. टोकन नंबरनुसार त्यांना कपडे खरेदी करता येईल. जे कस्टमर फोनवरून माहिती घेतात त्यांना आम्ही ठराविक वेळेलाच येण्याची विनंती करणार आहोत. शोरुममध्ये गर्दी होऊ नये याची पुरेपूर काळजी घेणार आहोत.दिवसातून तीनवेळा संपूर्ण शोरुम निर्जंतुकीकरण करणार आहोत.- राजेश पवार, एम. डी., व्ही. आर. पवार सारीज

 एकूण कर्मचाºयांपैकी फक्त वन थर्ड कर्मचाºयांना कामावर बोलावले आहे. सुरुवातीच्या काही दिवसात ग्राहकांची मोठी गर्दी राहील, बहुतांश ग्राहकांना आम्ही होम डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतोय. आॅनलाईन डिलिव्हरी सुरु आहे. ग्राहकांना फिजिकल डिस्टन्स बंधनकारक करणार आहोत. सध्या संपूर्णचे शोरुम निर्जंतुकीकरण केले आहे. यंदाच्या हंगामामध्ये एसी, कुलर तसेच रेफ्रीजरेटर यांची विक्री अत्यल्प झाली आहे. या उत्पादनांची खरेदी करणाºयांना २५ ते ३० टक्क्यांची सूट देणार आहोत. फायनान्स कंपन्यांकडून भरघोस सूट दिली जात आहे.- शंतनू बदामीकर, बदामीकर अँड सन्स

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटMarketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्या