शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवर भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 13:05 IST

अधीक्षक अभियंत्यांची माहिती: विजेच्या मागणीत वाढ, निर्मितीत घट

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात तांत्रिक, वाणिज्य असे गृहीत धरून ४० टक्के वीज गळतीसोलापूर जिल्ह्यात फक्त शेतीपंपांवरील जोडणीवर भारनियमन हे भारनियमन थोड्या काळासाठी असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे

अप्पासाहेब पाटीलसोलापूर : कोळशाचा तुटवडा, पाणी वापरावर आलेले निर्बंध यामुळे राज्यातील वीजनिर्मितीत मोठ्या प्रमाणात घट झाली़ यामुळेच महावितरण प्रशासनाला नाइलाजास्तव भारनियमन करावे लागत आहे़ सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवरून पहिल्या तासापेक्षा २ तास अधिकचे भारनियमन करण्यात येत असल्याची माहिती सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, अकलूज, पंढरपूर, बार्शी असे पाच विभाग येतात़ या पाच विभागांतर्गत जिल्ह्यात २५४ उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत़ त्यात १३६६ फिडर्स आहेत़ त्यापैकी २१८ फिडर्स शेतीपंपांचे आहेत़ आॅक्टोबर हीटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोळशाचा तुटवडा व पाण्याची कमतरता जाणवत असल्याने भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणने सांगितले़ सोलापूर जिल्ह्यातील ज्या भागात वसुली कमी आहे व वीज गळती जास्त त्या भागात प्रामुख्याने भारनियमन करण्यात येत असल्याचेही सांगितले.

शहरात भारनियमन नाही... पण

- सोलापूर शहरात महावितरणकडून कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात येत नाही़ मात्र ज्या भागात लाईन बंद होणे, स्मार्ट सिटीच्या कामासाठी बंद करणे, तारा तुटणे, शॉर्टसर्किटने वायर जळणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे, महावितरणकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात आदी प्रकारांमुळे त्या त्या भागातील वीज काही काळासाठी बंद करण्यात येत असते़ त्यामुळे ग्राहकांना वाटते की, भारनियमन सुरू झाले की काय? पण शहरात कुठेही भारनियमन नसल्याचेही स्पष्टीकरण ज्ञानदेव पडळकर यांनी दिले़

सोलापूर जिल्ह्यात फक्त शेतीपंपांवरील जोडणीवर भारनियमन करण्यात येत आहे़ ज्या भागात ४० टक्के विजेची हानी आहे, जिथे वसुली कमी आहे, त्याच भागात प्रामुख्याने भारनियमन करण्यात येत आहे़ हे भारनियमन थोड्या काळासाठी असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, सोलापूर

वीज गळती ४० टक्क्यांवर पोहोचलीमहावितरणच्या मुख्य तारेवर आकडा टाकणे, अनधिकृत वीजजोडणी, हुक टाकणे, मीटर डायरेक्ट करणे, मीटरमध्ये पट्टी टाकणे, मीटरमध्ये छेडछाड करून चुकीचे रीडिंग दाखविणे, मीटर बंद पाडणे यांसारख्या चुका करून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होती़ सोलापूर जिल्ह्यात तांत्रिक, वाणिज्य असे गृहीत धरून ४० टक्के वीज गळती होत असल्याची माहिती महावितरणने सांगितली.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन