शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठीची वजनकाटे भरारी पथके कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:52 IST

सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन ७८ दिवस उलटले तरी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी झालेली नाही. वजनकाटे ...

ठळक मुद्देवजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना २२ दिवसाखाली करण्यात आलीवजनकाटे तपासणीसाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्यापथके तयार करण्याच्या सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांनी तशी २७ डिसेंबरच्या आदेशान्वये मंजुरी दिली

सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन ७८ दिवस उलटले तरी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी झालेली नाही. वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना २२  दिवसाखाली करण्यात आली आहे. 

साखर कारखान्यांच्या वजनकाट्याबाबत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांकडून सातत्याने संशय व्यक्त केल्याने मागील वर्षापासून साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत. याहीवर्षी भरारी पथके तयार करण्याच्या सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांनी तशी २७ डिसेंबरच्या आदेशान्वये मंजुरी दिली आहे. वैधमापन शास्त्र विभाग, महसूल विभाग, पोलीस कर्मचारी, प्रादेशिक सहसंचालक(साखर) व साखर कारखाना कार्यक्षेत्रातील एक शेतकरी अशी संयुक्त समिती प्रत्येक कारखान्याचा वजनकाटा तपासणी करणार आहे.  

साखर हंगाम सुरू झाल्यानंतर लागलीच या समित्या स्थापन करून कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी करणे अपेक्षित आहे; मात्र तहसीलदार पातळीवर भरारी पथकांच्या समित्याही स्थापन झालेल्या नाहीत. राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांचे गुरुवातपर्यंत एक कोटी ९ लाख १८ मे.टन गाळप झाले आहे. या कालावधीत अवघ्या दोन कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्यात आली आहे. गाळप हंगामाचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी भरारी पथकांची तपासणी अन्य तालुक्यात सुरू झालेली नाही. 

सूचना देऊन होतेय तपासणीभरारी पथकाने कधीही व कोणत्याही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी करणे अपेक्षित आहे; मात्र तसे होत नाही. कारखाना कार्यक्षेत्रातील तहसीलदार, नायब  तहसीलदार किंवा अव्वल कारकुनावर वजनकाट्याची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवितात. पोलीस खात्याचा एखादा पोलीस व सोईचा शेतकरी समितीवर घेऊन कारखाना प्रशासनाला सांगून वजनकाट्याची तपासणी मागील वर्षी केली होती. यावर्षी तपासणीच झाली नाही. 

जिल्हाधिकाºयांनी वजनमापे निरीक्षक शिवाजी बागल यांच्यावर सर्व तालुक्यातील कारखाने तपासणीची जबाबदारी दिली आहे. लेखापरीक्षक पी. आर. शिंदे यांच्यावर पंढरपूर,सांगोला व माळशिरस, एन.डी. गाढे यांच्यावर बार्शी,माढा, करमाळा व मोहोळ तर के.आर. धायफुले यांच्यावर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट व मंगळवेढ्याची जबाबदारी दिली आहे.जिल्हाधिकाºयांच्या २७ डिसेंबरच्या पत्राचा संदर्भ देत सहायक नियंत्रक वैधमापन शिवाजी बागल यांनी हीच तारीख देत प्रत्येक तालुक्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती आदेश काढला आहे. २७ डिसेंबर रोजी भरारी पथकांचा आदेश असला तरी २२  दिवसानंतरही तपासणीला मुहूर्त लागला नाही.

भरारी पथक हंगामात एकदाच तपासणी करते व साखर कारखानदारांना  तपासणीला येणार हे अगोदरच माहीत असते. यावर शेतकºयांनी एकत्रित येऊन वजनकाटा तयार करणे हाच मार्ग आहे. त्यासाठी प्रयत्न करु.- महामूद पटेलअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनाजिल्हाधिकाºयांकडून मिळालेल्या आदेशाच्या आधारे तहसीलदारांना पत्र दिले आहे. त्यांनी तालुका पातळीवर पथक तयार करावयाचे आहे. तहसीलदारांकडून अद्याप तपासणीचे निरोप नाहीत.- शिवाजी बागल,सहायक नियंत्रक,वैधमापन 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय