सोलापूर जिल्ह्यातील आठवडा बाजार सुरु होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 05:30 PM2021-10-28T17:30:39+5:302021-10-28T17:30:48+5:30

सोलापूर , :- राज्यात  कोविड-19 संसर्गाच्या अनुषंगाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत शासनाने सुधारित आदेश पारित केलेले आहेत.  यामध्ये  कोरोना ...

Weekly market will start in Solapur district; Order issued by the Collector | सोलापूर जिल्ह्यातील आठवडा बाजार सुरु होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

सोलापूर जिल्ह्यातील आठवडा बाजार सुरु होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Next

सोलापूर, :- राज्यात  कोविड-19 संसर्गाच्या अनुषंगाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत शासनाने सुधारित आदेश पारित केलेले आहेत.  यामध्ये  कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने. आपत्ती व्यवस्थापन 2005 अन्वये प्राप्त अधिकारानुसार शहर पोलीस आयुक्तालयची हद्द वगळून सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे आठवडा बाजार व जनावरांचे बाजार दिनांक 28 ऑक्टोबर 2021 पासून भरण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी  निर्गमित केले आहे.

 सदर आठवडा बाजारामध्ये कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाने  तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येते का याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने नियत्रंण ठेवावे.  तसेच आठवडा बाजारात स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने दिलेल्या अटींचे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आठवडी बाजाराशी संबधित असणाऱ्या आस्थापनांनी बाजार भरण्याच्या ठिकाणी मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन याबाबत नियमांचे पालन करावे. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच शासनाने व जिल्हा प्रशासनाने  कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत  स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने नियंत्रण ठेवावे. सदरचे आठवडा बाजार स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरु राहण्यास परवानगी असेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Weekly market will start in Solapur district; Order issued by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.