शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मास्क बांधून घरातच शुभमंगल झाले; अन् तिने थेट बुलेटवरुन सासर गाठले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:51 IST

भटजीबुवाही तोंड झाकूनच : लॉकडाऊनमुळे केवळ आई-वडिलांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धमान नगरातील शांत वातावरण, मात्र एका कुटुंबात धावपळ दिसलीमंगलाष्टका कानी पडल्या...घराबाहेर तर कोणीच नाही़ सनई चौघडे नाहीत, ना बँड, ना वरात...ना पंगती झडल्या..

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धमान नगरातील शांत वातावरण, मात्र एका कुटुंबात धावपळ दिसली...मंगलाष्टका कानी पडल्या...घराबाहेर तर कोणीच नाही़ सनई चौघडे नाहीत, ना बँड, ना वरात...ना पंगती झडल्या... मास्क बांधलेल्या भटजीबुवांसह केवळ तीनच लोकांच्या साक्षीनं वधू-वराचं लग्न लागलं...अक्षता पडताच दोघेही सासरी बुलेटवरुन काही क्षणात स्वार झाले.

 कोरोनाच्या दडपणाखाली हा छोटेखानी विवाह सोहळा रंगला वर्धमान नगरात बसुदे-पाटील यांच्या कुटुंबात. रुपाभवानी मंदिर परिसरात वर्धमाननगर येथील नागनाथ बसुदे-पाटील यांची मुलगी तृप्ती ही शिक्षण घेत असताना तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी (उस्मानाबाद) येथील मुलाचे स्थळ आले.

सूरज संजय शिनगारे असे त्या इंजिनिअर मुलाचे नाव असून, जवळपास सात महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडाही उरकला होता. त्यानंतर १६ एप्रिल लग्नाचा मुहूर्त ठरला.त्यानंतर दोन्ही कुटुंबातील लोकांकडून उत्साहाच्या भरात खरेदीला सुरुवात झाली. मंगल कार्यालयही बुक केले. मात्र तारीख जवळ आली आणि कोरोनाच्या संकटाने दोन्ही कुटुंबाच्या आनंदावर विरजन टाकले.

यातूनही दोन्ही कुटुंबाने मार्ग काढला आणि ५ मे रोजी मुलीच्याच घरी विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. अन तसेच झाले...मंगळवारी दुपारी १२.३० वाजता केवळ भटजी, मुलीचे आई-वडील या तिघांच्याच साक्षीनं तृप्ती आणि सूरजचा विवाह सोहळा रंगला़Þ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घातलेले नियम पाळत वधू-वरांनी आणि त्या इतर तिघांनी तोंडावर मास्क बांधून विधी पार पाडला़. दोघांनीही एकमेकांना हार घालत विवाह बंधनात अडकले.

दोन तासात वानेवाडी गाठली...- हा विवाह सोहळा खूप कमी वेळेत पार पडला. अक्षता पडताच पुढील विधी भटजीबुवाने लवकरात लवकर उरकले तत्पूर्वी बसुदे-पाटील यांनी पोलिसांकडून परवानगीही घेतली होती़. अक्षतानंतर दोन तासात या वधू-वराने घर सोडले दोघेही दोन तासात बुलेटवरुन वानेवाडी गाठली. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने संचारबंदीत तृप्तीची मोठी बहीण आणि नातेवाईक यापैकी कोणीच या सोहळ्याला हजेरी लावू शकले नाहीत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न