शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी उमेदवारीसाठी मुंबईत ठोकला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 13:03 IST

विधानसभा निवडणुक राजकारण; प्रतीक्षा संपेना, भाजप प्रवेशाचे मुहूर्त रखडले; कार्यकर्ते अस्वस्थ

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी सोमवारी राजीनामे दिले तर त्यांचा भाजप प्रवेश नक्की झाला असे मानण्यात येत आहे.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कोणत्या मतदारसंघातून कोण कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीभाजप-सेना युती होणार की नाही हे अद्याप निश्चित नसल्याने मतदारसंघातील लढतीविषयी वेगवेगळी चर्चा सुरू

सोलापूर : विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी मुंबई गाठली आहे. भाजप प्रवेशाची चर्चा असलेले नेते मुंबईत मुक्काम ठोकून असून, अद्याप त्यांना मुहूर्त सापडलेला नसल्याने इकडे कार्यकर्ते बेचैन झाले आहेत. 

भाजप प्रवेशाची चर्चा असलेले अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. रविवारी आमदार म्हेत्रे व त्यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे दोघे एका मंदिरात पूजेचे ताट व हातात कमळाचे फूल घेऊन बसल्याचे हे छायाचित्र आहे. भाजप प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या म्हेत्रे यांच्या हाती कमळ अशी कमेंट असलेले हे छायाचित्र आज चर्चेचे ठरले; मात्र हे छायाचित्र दीड वर्षापूर्वी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात काढले असल्याचे स्पष्टीकरण सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहे. 

तर इकडे कार्यकर्ते वारंवार त्यांच्या समर्थकांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून काय झाले असा सवाल करताना दिसत आहेत. सोमवारपर्यंत थांबा असा निरोप दिला जात आहे. 

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, पंढरपूरचे आमदार भारत भालके हेही मुंबईत असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईत होते. त्यांच्या उपस्थितीत आमदारांचे प्रवेश होतील असे सांगितले जात होते. पण आमदारांनी राजीनामा न दिल्याने प्रवेश रखडला असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अ‍ॅड. मिलिंद थोबडे हेही मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पण शहा यांच्या दौºयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकली नाही असे सांगण्यात आले. दरम्यान, अ‍ॅड. थोबडे यांच्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. 

आज ठरणार भवितव्य- सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी सोमवारी राजीनामे दिले तर त्यांचा भाजप प्रवेश नक्की झाला असे मानण्यात येत आहे. आमदारांच्या समर्थकांनी तसे कार्यकर्त्यांना निरोप दिले आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कोणत्या मतदारसंघातून कोण कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप-सेना युती होणार की नाही हे अद्याप निश्चित नसल्याने मतदारसंघातील लढतीविषयी वेगवेगळी चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकMumbaiमुंबईPoliticsराजकारणBJPभाजपा