रस्त्यांच्या कामांना मुहूर्त, दिवाबत्तींचीही सोय करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:33+5:302021-09-03T04:22:33+5:30
मांगी रस्त्यावरील ५० हेक्टर क्षेत्र सन १९९७ साली एमआयडीसीसाठी संपादित केलेले आहे. सदरचे क्षेत्र संपादित झाल्यापासून या एमआयडीसीचे कामकाज ...

रस्त्यांच्या कामांना मुहूर्त, दिवाबत्तींचीही सोय करू
मांगी रस्त्यावरील ५० हेक्टर क्षेत्र सन १९९७ साली एमआयडीसीसाठी संपादित केलेले आहे. सदरचे क्षेत्र संपादित झाल्यापासून या एमआयडीसीचे कामकाज रेंगाळले होते. यामध्ये आयटीआयची इमारत बांधून तेथे आयटीआय सुरू झालेले आहे. याशिवाय एमएसईबीचे उपकेंद्र झालेले आहे. अन्य कोणतेही कामकाज झालेले नव्हते. त्यामुळे येथे उद्योजक येऊ शकलेले नाहीत. आमदार शिंदे यांनी याकामी लक्ष घालून हे कामकाज सुरू केलेले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात रस्ते होणार असून, त्यानंतर दिव्याची सुविधा केली जाईल. त्यानंतर ऑनलाइन प्लॉटिंग सुरू केली जाणार आहे. सर्व सुविधा दिल्यानंतर हे ऑनलाइन प्लॉट वितरित केले जातील.
...........
मांगी तलावातून येथे पाणी आणण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. मांगी तलावाचे पाणी मिळाल्यानंतर हे पाणी एमआयडीसीसाठी काही प्रमाणात राखीव ठेवले जाईल. लवकरच सर्व सुविधा उपलब्ध करून उद्योगाच्या दृष्टीने एमआयडीसीच्या प्लॉटचे वितरण होईल. उद्योजकांनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बुकिंग करून प्लॉट घेऊन व्यवसाय करावा.
-संजयमामा शिंदे, आमदार
........
(फोटो आमदार संजयमामा शिंदे)