शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Solapur Flood; करमाळ्यात उजनी पाण्याच्या लाटा अन् भोसगीत बंद हापशाला येतेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:28 IST

सोलापूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस: एकीकडं वनराई बहरली.. दुसरीकडं मोठं नुकसान

सोलापूर: जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेय. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच वरदायिनी उजनीत प्रचंड पाणीसाठ्यामुळे करमाळा व इंदापूर तालुक्यांच्या सीमेवर समुद्र किनाºयाप्रमाणे लाटा दिसू लागल्या आहेत.

अक्कलकोट तालुक्यातील भोसगी येथे तर अनेक दिवसांपासून बंद असलेल्या हापशांना पाणी येऊ लागले आहे.करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातून वाहणाºया भीमा नदीचे पात्र मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. वादळी वाºयामुळे पाण्यात निर्माण झालेल्या लाटा ब्रिटिशकालीन डिकसळच्या पुलावर धडकल्यानंतर जणू मुंबईच्या समुद्र किनाºयावरील पाण्याच्या लाटांचा प्रत्यय इथल्या पर्यटकांना येऊ लागला आहे.

पुणे जिल्ह्यातून आलेली भीमा नदी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातून उजनी धरणाकडे वाहते. उजनी धरण सध्या ओव्हरफलो झाले असून, उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र करमाळा तालुक्यातील पुनर्वसित कंदर, सांगवी, वांगी, ढोकरी, भिवरवाडी, सोगाव, कुगाव, चिखलठाण, दहिगाव, पोमलवाडी, केत्तूर, वाशिंबे, कोंढारचिंचोली, टाकळी आदी २० गावांच्या शिवारात अथांग समुद्रासारखे पसरलेले आहे. पर्यटक वाढलेल्या पाण्यातून मच्छीमार बोटीद्वरे प्रवास करून पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्यात लाटा निर्माण होत आहेत.----------तरुणाईची सेल्फीसाठी धडपडकरमाळा व इंदापूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाखालून भीमा नदी वाहत असून, पुलाच्या परिसरात पाण्यात निर्माण झालेल्या लाटा पुलाच्या कठड्याला धडकून उंच उडत असल्याने येणा?्या-जाणा?्यांना जणू मुंबईच्या समुद्रातील लाटांचा अनुभव येत आहे. तरुणाईची मोठ्या उत्साहात या लाटांचा पुलावर सेल्फी घेण्याची धडपड दिसून आली. 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसfloodपूरkarmala-acकरमाळाUjine Damउजनी धरण