शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात आजपासून तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:23 IST

कृत्रिम टंचाईमुळे शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा; पंपगृहांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगितले कारण

ठळक मुद्देपाकणी पंपगृहातील सीटीपीच्या विद्युत यंत्रणेत रविवारी रात्री ११ ते दोन वाजेपर्यंत बिघाड झाला होतापाकणी पंपगृहावरुन पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होऊ शकणार नाहीटाकळी पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या परिसराचा बुधवारचा पाणी पुरवठा गुरुवारी

सोलापूर : उजनी, टाकळी पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने आणि पाकणी पंपगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शहरातील पाणी पुरवठा आजपासून सलग तीन दिवस विस्कळीत राहणार आहेत. 

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख गंगाधर दुलंगे म्हणाले, शहरास पाणी पुरवठा करणाºया उजनी व टाकळी पंपगृहाचा वीजपुरवठा शुक्रवारी आणि शनिवारी खंडित झाला होता. उजनी पंपगृहाचा विद्युत पुरवठा रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२.१५ पर्यंत खंडित झाला होता. टाकळी पंपगृहाचा विद्युत पुरवठा शनिवारी सकाळी ८.४५ ते दुपारी १२ पर्यंत खंडित झाला होता. उजनी व टाकळी येथील पंप सुरू होऊन पाणी पोहोचण्यास बराच कालावधी लागला. 

उजनी पाईप लाईन आणि भवानी पेठ पंपगृहावर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा मंगळवारऐवजी बुधवारी होईल. टाकळी पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या परिसराचा बुधवारचा पाणी पुरवठा गुरुवारी होईल. 

पाकणी पंपगृहात दुरुस्तीचे काम करणार- पाकणी पंपगृहातील सीटीपीच्या विद्युत यंत्रणेत रविवारी रात्री ११ ते दोन वाजेपर्यंत बिघाड झाला होता. या पंपगृहाच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाकणी पंपगृहावरुन पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होऊ शकणार नाही. 

शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा- सध्या शहरात चार दिवसाआड पाणी येते. उजनी व टाकळीतील पंपगृहातील विद्युत बिघाडामुळे यात एक ते दोन दिवसांचा फरक पडणार आहे. विद्युत पुरवठा खंडित होणे, पंपगृहात बिघाड होणे, उजनी ते सोलापूरची पाईप लाईन फुटणे असे प्रकार वारंवार होतात. या कारणांमुळे अनेक भागात पाच ते सहा दिवसाआड पाणी येते. आता केवळ दोन ते तीन तास विद्युत पुरवठा खंडित होऊनही  पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठ्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरण