शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोडनिंबचा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद; नागरिकांचे हाल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:46 IST

मोडनिंब : गावातील नळयोजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.  ...

ठळक मुद्देमोडनिंब पाणीपुरवठ्यासाठी चार जलकुंभ असून, यामधून एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठाविहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे मोडनिंबजवळील जलशुध्दीकरण केंद्रात सोडले येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांचे हाल सुरू

मोडनिंब : गावातील नळयोजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. 

याबाबत सविस्तर असे, मोहोळ तालुक्यातील येवती तलावातून मोडनिंब, माढा, आष्टी, रोपळे, शेटफळ यासह अन्य गावांना पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या येवती तलावातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व नळपाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मोडनिंब पाणीपुरवठ्यासाठी चार जलकुंभ असून, यामधून एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र पंधरा दिवसांपासून येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने मोडनिंब गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीत तलावाजवळील विद्युतपंपाच्या साह्याने पाणी टाकले जाते व ते विहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे मोडनिंबजवळील जलशुध्दीकरण केंद्रात सोडले जाते. तेथून गावातील जलकुंभात सोडले जाते.

या धरणात पाटबंधारे खाते पाणी कधी सोडणार, याबाबत कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अनेकदा प्रयत्नही करून फोन घेतला नाही. याबाबत मोडनिंबचे सरपंच जयसिंग म्हणाले, पाणी संपुष्टात आल्याने गढूळ व गाळमिश्रित पाणी व तेही अपुरे यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. येवती तलावात पाणी सोडावे, यासाठी १४ मार्चपासून येवती तलावालगतच आमरण उपोषणास बसणार असून, याबाबत संबंधित खात्यास कळविले असल्याचे सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीdroughtदुष्काळwater transportजलवाहतूक