पाऊस नसतानाही मांडेगावात बोअरमधून वाहतंय पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:21 IST2021-08-01T04:21:54+5:302021-08-01T04:21:54+5:30
जमीन सपाटीपासून खोल शेतजमीन असेल तर पाणी बोअर सुरु न करता पाणी येणे ठीक आहे पण गावाच्या उंच भागात ...

पाऊस नसतानाही मांडेगावात बोअरमधून वाहतंय पाणी !
जमीन सपाटीपासून खोल शेतजमीन असेल तर पाणी बोअर सुरु न करता पाणी येणे ठीक आहे पण गावाच्या उंच भागात असलेल्या शेतकरी विष्णू मिरगणे यांच्या शेतात घेतलेल्या बोअरमध्ये दिवसभर पाणी वाहताना दिसत आहे.पाणी फाउंडेशनचे काम मागील तीन वर्षांपासून मांडेगाव येथे सुरु आहे. फाउंडेशनचे अमीर खान, किरण राव यांच्यासह त्यांच्या टीमचा आम्हा ग्रामस्थांना अभिमान आहे असेही मिरगणे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या पाच दिवसांपासून बोअर सुरु केला नाही तरी पाणी वाहत आहे, पाऊस थोडा झालेला आहे; पण नाले, बंधारे यात पाणी असल्यामुळे फरक पडला तसेच येथून तलाव एक किलोमीटर अंतरावर आहे असे शेतकरी विष्णू मिरगणे यांनी स्पष्ट केले.
----
तालुक्यातील प्रत्येक गावाने पडलेल्या पावसाचे पाणी आपल्याच गावात पाणी अडवले व जिरवले तर निश्चित फायदा होतो याचे उत्तम उदाहरण मांडेगाव येथे पाहायला मिळत आहे, असे काम केले तर भविष्यात निश्चित शेतकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही.
-पंडित मिरगणे, सरपंच मांडेगाव