आंदेवाडी, बोरगाव पुलावर पाणी; गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:43+5:302021-09-02T04:47:43+5:30

या पावसामुळे घोसाळगाव, शिरवळवाडी, अक्कलकोट शहरातील हत्तीतलाव, गळोरगी, आदी ठिकाणच्या साठवण तलावात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच शिरसी, ...

Water on Andewadi, Borgaon bridge; The villages lost contact | आंदेवाडी, बोरगाव पुलावर पाणी; गावांचा संपर्क तुटला

आंदेवाडी, बोरगाव पुलावर पाणी; गावांचा संपर्क तुटला

या पावसामुळे घोसाळगाव, शिरवळवाडी, अक्कलकोट शहरातील हत्तीतलाव, गळोरगी, आदी ठिकाणच्या साठवण तलावात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच शिरसी, सांगवी, बादोले, बोरगाव, असे अनेक ओढे भरून वाहत आहेत. तसेच बोरी, हरणा नदी तुडुंब भरून वाहत असल्याने कुरनूर धरण शंभर टक्के भरून वाहत आहे. त्यामुळे खाली बोरी नदीपात्रात शेकडो क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने वरच्या भागातून पाणी येण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जोपर्यंत येण्याचे प्रमाण अधिक राहील, तोपर्यंत खाली पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. यापूर्वीच पावसाअभावी उडीद, मूग सुकून गेले आहे. आता झालेल्या पावसामुळे ऊस, तूर, डाळिंब, द्राक्ष, केळी, लिंबू, आवळा, पेरू, चिकू, अशा विविध प्रकारच्या फळपिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे ही पिके शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता वाढली आहे.

.........................

दोन दिवसांत झालेला पाऊस (मंडलनिहाय)

अक्कलकोट- २७ मिमी, चप्पळगाव- २९, वागदरी- २४, किणी- १९, मैंदर्गी- ११, दुधनी- १२, जेऊर- १७, करजगी- १३, तडवळ- १२ असे नऊ मंडलात सरासरी १८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

..........

फोटो ओळ:- दोन दिवसांत झालेल्या पावसाने बोरगाव दे. येथील ओढा पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

(फोटो ३१अक्कलकोट

Web Title: Water on Andewadi, Borgaon bridge; The villages lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.