वारकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: June 20, 2014 00:52 IST2014-06-20T00:52:56+5:302014-06-20T00:52:56+5:30
वारकऱ्याला रेल्वेची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला़

वारकऱ्याचा मृत्यू
नरखेड : आळंदीहून पंढरपूरला येणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या वारकऱ्याला रेल्वेची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला़ ही घटना १९ जून रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देहू येथे घडली़ एकनाथ नारायण पारडे (वय ७५, रा़ मलिकपेठ, ता़ मोहोळ) असे मयताचे नाव आहे़
आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज तर देहू येथून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे़ या पालखी सोहळ्याचा दिव्य क्षण आपल्या हृदयात साठवून ठेवण्यासाठी सालाबादप्रमाणे यावर्षीही एकनाथ पारडे हे बुधवारी रात्री मलिकपेठ येथून पुणे पॅसेंजर रेल्वेने गेले होते़ पुणे येथे उतरून आळंदीकडे जात असताना देहू येथील रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वेने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ त्यांच्यावर गुरुवारी दुपारी मलिकपेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़