शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

वारकºयास भपकेबाज सुविधांची अपेक्षा नसते : रामचंद्र शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 2:03 PM

सोलापूर लोकमत स्पेशल ‘वारी अधिकाºयांची’

ठळक मुद्देपंढरपूरला येणारा भाविक हा खूप सोशिक आहे पाणी, आरोग्य, शौचालय आणि वाहतुकीच्या सुविधा याच त्यांच्या अपेक्षा असतातयंदाच्या वर्षी मी वारीचा प्रशासकीय जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहतोय - रामचंद्र शिंदे

पंढरपूरला येणारा भाविक हा खूप सोशिक आहे. पाणी, आरोग्य, शौचालय आणि वाहतुकीच्या सुविधा याच त्यांच्या अपेक्षा असतात. या सर्व गोष्टी त्याला वेळेवर मिळायला हव्यात. भपकेबाज सुविधांची त्याला अपेक्षाही नाही. १९९९-२००२ या कालावधीत मी पंढरपूरचा प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होतो. नवखा माणूस म्हणून माझ्यावरही दडपण होतेच. जिल्हाधिकारी हे मंदिर समितीचे प्रशासक असल्याने मंदिर समितीचे कामही माझ्याकडे होते. 

पहिल्याच वर्षी मला काही गोष्टी लक्षात आल्या. वाखरी ते पंढरपूर हा रस्ता एकपदरीच होता. दशमीला सकाळी जवळपास सर्वच पालख्या वाखरीला एकत्र येतात आणि दुपारनंतर वारकºयांचे जत्थे पंढरपुरात येऊ लागतात. वाखरी ते पंढरपूर या एकपदरी रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत गर्दीच गर्दी असायची. पालख्यांसोबत आलेल्या वाहनांना पंढरपुरात येण्यास वेळ लागायचा.

वारकºयांचे साहित्य शहराबाहेरच राहिले, त्यांना वेळेवर जेवणच मिळाले नाही, अशा अनेक तक्रारी पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांकडून ऐकायला मिळायच्या. आषाढी वारीनंतर काही दिवसांत आम्ही वाखरी ते पंढरपूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार केला. तो तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे सादर केला आणि विशेष म्हणजे पुढील वर्षापर्यंत चौपदरी रस्ता तयारही झाला. आमच्या काळात झालेले हे महत्त्वपूर्ण काम म्हणावे लागेल. 

यानंतर २००३-२००६ या काळात फलटणचा प्रांताधिकारी म्हणून रुजू झालो. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी याच मार्गावरून येते. पंढरपूरच्या तुलनेत तिथे फारसे काम करावे लागले नाही. पण पालखी प्रमुखांशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा, स्वच्छता आदी कामे करून घेतली. यंदाच्या वर्षी मी वारीचा प्रशासकीय जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहतोय. १८ वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज पंढरपुरात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत.

प्रशासनाकडे त्यावेळी फारसे कर्मचारी नसायचे. मोजक्या कर्मचाºयांकडून काम करून घ्यावे लागायचे. आज रस्त्यांची कामे झालीत. मोठा पूल झाला. शौचालयांची संख्या वाढलेली आहे. ६५ एकर परिसर विकसित झाला आहे. वारी काळात बसस्थानके शहराच्या बाहेर हलविण्यात आली आहेत. सुविधा नव्हत्या तेव्हाही पंढरपूर शहर एकाच दिवशी १० लाख भाविकांना सामावून घ्यायचे. आजही तोच उत्साह आहे. प्रशासनातील मंडळीही मोठ्या उत्साहाने काम करीत आहेत. ही त्यांची एकप्रकारची वारकरी सेवाच आहे. शब्दांकन : राकेश कदम

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी