सोलापुरात वारक-यांचा ट्रक उलटला, 6 जण जखमी
By Admin | Updated: June 29, 2017 14:28 IST2017-06-29T14:28:47+5:302017-06-29T14:28:47+5:30
माळशिरस कमळमाळा येथे ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे यांच्या दिंडी क्र १३६ रथामागे या दिंडीतील साहित्याने भरलेला ट्रक मुक्कामाच्या ठिकाणी जात उलटल्याने अपघात झाला

सोलापुरात वारक-यांचा ट्रक उलटला, 6 जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 29 - माळशिरस कमळमाळा येथे ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे यांच्या दिंडी क्र १३६ रथामागे या दिंडीतील साहित्याने भरलेला ट्रक मुक्कामाच्या ठिकाणी जात उलटल्याने अपघात झाला. यात स्वयंपाक करणाऱ्या महिला व पुरुष , वृद्ध, १५ते २० भाविक होते.
सुदैवानं या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, 2 किरकोळ तर अन्य 4 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची बातमी समजताच बंदोबस्तासाठी असणारे पोलीस अधिका-यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
नातेपुते मुक्कामानंतर सकाळी लवकर ताडपत्री, बांबू, खुंट्या, पाण्याची टाकी, स्वयंपाकाचे साहित्य घेऊन ट्रक माळशिरस येथे आला. त्यात 20 ते 25 लोक बसले होते. या दिंडीचा मुक्काम कमळमळा येथे देवीच्या मंदिराजवळ होता. तिरवंडी रोडणे मंदिराकडे वळताना पुढील ट्रक उलटला.
यावेळी जवळच्या लोकांनी साहित्य बाजूला घेऊन अडकलेल्या महिला व वृद्धांची सुटका केली यातील चार जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अकलुज येथील रूग्णालयात नेण्यात आले. अन्य भाविकांवर माळशिरस रुग्णालयात उपचार सुरू होते.