काँग्रेस भवनात प्रभाग रचना, नकाशा पाहण्याची व्यवस्था
By Admin | Updated: October 23, 2016 18:22 IST2016-10-23T18:22:16+5:302016-10-23T18:22:16+5:30
फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेली प्रभाग रचना आणि नकाशा पाहण्यासाठी काँग्रेस भवनात खास सोय

काँग्रेस भवनात प्रभाग रचना, नकाशा पाहण्याची व्यवस्था
dir="ltr">
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 - फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेली प्रभाग रचना आणि नकाशा पाहण्यासाठी काँग्रेस भवनात खास सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया, माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी खासदार धर्मण्णा सादुल, महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर, राहुल गायकवाड, अंबादास गुत्तीकोंडा, सुमन जाधव, विठ्ठल भंडारी, आझम सैफन, राजन कामत, करीम शेख, बशीर शेख, गोविंद कांबळे, शुकूर शेख, पुरुषोत्तम श्रीगादी, मुश्ताक लालकोट, सुनिल इंगळे, सूर्यकांत शेरखाने, ज्ञानेश्वर कांबळे आदी उपस्थित होते. प्रभाग रचना आणि नकाशाचे संकलन काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा यांनी केले.