पंढरपूरला माघी वारीसाठी पायी चालत निघालेल्या वारकऱ्याचा क्रेनने धडक दिल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:02 IST2021-02-20T05:02:26+5:302021-02-20T05:02:26+5:30
शंकरराव आण्णासाहेब जाधव हे कोल्हापूर येथून पंढरपूरला माघी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत निघाले होते. ते सोलापूर-सांगली हायवेवरील ...

पंढरपूरला माघी वारीसाठी पायी चालत निघालेल्या वारकऱ्याचा क्रेनने धडक दिल्याने मृत्यू
शंकरराव आण्णासाहेब जाधव हे कोल्हापूर येथून पंढरपूरला माघी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत निघाले होते. ते सोलापूर-सांगली हायवेवरील जुनोनी ते उदनवाडी पुलाजवळ ब्रीज क्र. २७० येथून जात असताना शुक्रवारी सकाळी जुनोनीकडून भरधाव वेगाने नाझरा मठाकडे जाणाऱ्या एमएच १०/डीजी २९९१ या हायड्रो क्रेनच्या चालकाने शंकरराव जाधव यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर क्रेनसह चालक तेथून पळून गेला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीसपाटील विकास कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्याच्या मोबाईलवरून त्यांच्या कोल्हापूर (रंकाळा) येथील मुलास अपघाताची माहिती देऊन त्यांना तत्काळ उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा राम शंकरराव जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी क्रेनचालक इंद्रजीत गुप्ता (रा. ६४, कोना सोनबरसा गोरखपूर बढी, राज्य उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आप्पा कर्चे करीत आहेत.