पुण्यात घर बांधायचंय, माहेरहून चार लाख आण...; पत्नीचा केला छळ

By रवींद्र देशमुख | Updated: April 7, 2023 17:11 IST2023-04-07T17:10:54+5:302023-04-07T17:11:32+5:30

फिर्यादी गौरी यांचे स्वप्नील इनामदार याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला. विवाहानंतर त्यांच्या सासरच्या मंडळींनी छोट्या मोठ्या कारणावरून फिर्यादीसोबत भांडण करू लागले.

Want to build a house in Pune, bring four lakhs; Harassment of wife in Solapur | पुण्यात घर बांधायचंय, माहेरहून चार लाख आण...; पत्नीचा केला छळ

पुण्यात घर बांधायचंय, माहेरहून चार लाख आण...; पत्नीचा केला छळ

सोलापूर - लग्नामध्ये तुझ्या आई-वडिलांनी लग्नात मानपान केला नाही, पुणे येथे घर बांधण्यासाठी माहेरून चार लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गौरी स्वप्निल इनामदार (वय २२, रा. रेल्वे लाईन, वळसंगकर ब्लॉक) यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी गौरी यांचे स्वप्नील इनामदार याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला. विवाहानंतर त्यांच्या सासरच्या मंडळींनी छोट्या मोठ्या कारणावरून फिर्यादीसोबत भांडण करू लागले. शिवाय लग्नात मानपान केला नाही म्हणत त्यांचा छळ केला. अशा आशयाची फिर्याद गौरी यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती स्वप्नील इनामदार, सासू सुनीता इनामदार, सासरे सुनील इनामदार, दीर सचिन इनामदार ( सर्व. रा. मुपो. तिल्याळ आसंगी, ता. जत, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Want to build a house in Pune, bring four lakhs; Harassment of wife in Solapur