भिंतच अंगावर कोसळून मजूर ठार,सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील घटना
By Admin | Updated: April 18, 2017 18:16 IST2017-04-18T18:16:59+5:302017-04-18T18:16:59+5:30
.

भिंतच अंगावर कोसळून मजूर ठार,सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील घटना
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि १८ : वीट बांधकामाची भिंत ब्रेकर मशिन पाडताना अचानक भिंतच अंगावर कोसळून मजूर कामगार उपचारापूर्वी मरण पावल्याची घटना मंगळवार 18 रोजी दुपारी एकच्या सुमारास पाचेगांव खुर्द (ता.सांगोला) येथे घडली आहे. संतोष मोहन राऊत-२५ रा.एखतपूर रोड सांगोला असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पाचेगांव खुर्द येथील अशोक हणमंत कवडे यांच्या घराचे वीट बांधकाम असलेली भिंत मंगळवार १८ रोजी संतोष राऊत हा मजूर कामगार बे्रकर मशिनने पाडत होता. दरम्यान दुपारी एकच्या सुमारास भिंत पाडत असताना अचानक उर्वरीत भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने ही दुदैर्वी घटना घडली. संतोष राऊत यास गंभीर अवस्थेत कारमधून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला होता. अशोक हणमंत कवडे यांनी पोलीसात खबर दिली असून पोलीसांनी आकस्मीत मृत्यू अशी नोंद केली आहे़